Home जळगाव मुलगी बघायला आले अन लग्न करून गेले – मानियार बिरदारी ची हॅट...

मुलगी बघायला आले अन लग्न करून गेले – मानियार बिरदारी ची हॅट ट्रिक

1168
0

*मुली बघायला आले व लग्न करून गेले – मानियार बिरदारी ची हॅट ट्रिक*
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्हा मानियार बिरादरी च्या इतिहासात नोंद होण्यासारखी बाब म्हणजे मुलाकडील मंडळी मुलगी बघायला आले व लग्न करून मुलीला घेऊन गेले. ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत हे तिघी लग्न लागले असून त्याची चर्चा मानियार बिरादरी च्या महाराष्ट्र राज्य पातळीवर होत आहे.
सदर बाब हि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या जिल्ह्यातीलच असल्याने त्याचा एक चांगला मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे

*तीन निकाह – हॅट्ट्रिक*
*पहिला निकाह-विवाह*
शिरसोली येथील जिल्हा बिरदारीचे संचालक शेख इब्राहिम हे आपला मुलगा नावे शेख इफ्तेखार जो एक अभियंता आहे त्यासाठी चाळीसगाव येथील सय्यद हमीद यांच्या कडे मुली बघायला गेले व त्याच ठिकाणी निकाह म्हणजे लग्न लावून आले.
मुलगी हर्शिल बीने निकाहला समिती देताच तिचे तर्फे वकील म्हणून शेंदुर्णीचे रशीद सुपडू मणियार तर साक्षीदार म्हणून साखळीचे कय्युम शेख व जळगाव चे मुस्लिम अहमद हे होते

सदर विवाहासाठी कमरुन्निसा शेख इब्राहिम, फारुक शेख अमीर फैजपूर,अख्तर शेख जाफर मुंबई, रईस अहमद कजगाव, रफिक मनियार चाळीसगाव, शेख हुसेन भुसावळ यांनी प्रयत्न केले

*दुसरा निकाह-विवाह*

जळगाव येथील बिरादरीचे संस्थापक संचालक गुलाम रसूल बक्‍श हे आपल्या मुलगा नावे जुनेद शेख यासाठी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नाचण खेडा येथे शेख अफजल यांच्या कडे गेले असता मुलगी नाजिया ही पसंत पडली त्याच वेळी नाचण खेड्याचे जवाबदार रमजान टेलर यांच्याशी चर्चा करून संध्याकाळी सदर विवाह पार पडला या लग्नात वकील म्हणून अमळनेरचे फारुक शेख तर साक्षीदार म्हणून करीम शेख हकीम व हारून शेख बक्ष दोघी जळगाव यांनी आपले कर्तव्य बजावले.

*तिसरे लग्न- विवाह*

आज १० फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेश इच्छापुर येथून जळगाव मनियार वाड्यात कैलासवासी शेख इक्बाल शेख रहमान यांचा मुलगा साबीर शेख यांच्यासाठी जळगाव मन्यार वाड्यातील रहिवासी शेख अन्सार रमजान यांची मुलगी आयशा बी हीला बघण्यासाठी आले त्यावेळेस वर साबीर शेख यांचे मोठे बंधू फारुक शेख व साबीर शेख यांच्या जवळ बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चांद सय्यद अमीर यांनी निकाहची इच्छा प्रदर्शित केली असता त्यास त्यांनी मान्यता दिली लागलीच रात्री हा विवाह समारंभ जामा मसजिद येथे पार पडला.

या विवाह प्रसंगी अध्यक्ष फारूक शेख सह सलीम शेख मोहम्मद, अब्दुल रऊफ रहीम, शेख युसुफ इसा, शेख करीम रमजान, शेख शरीफ मोहम्मद, गुलाब भिकारी, लियाकत रमजान,सलीम रमजान,बिस्मिल्ला रमजान ,शेख फारुख शेख इक्बाल, अजिज शेख नजीर आदींची उपस्थिती होती.
सदर निकाहला वकील म्हणून शेख हसन हाजी रसूल जळगाव तर साक्षीदार म्हणून इच्छापुर चे शेख गफुर शेख रहमान व दुसरे रावेरचे शेख रशीद शेख महंमद यांनी कर्तव्य पार पाडले

*तिन्ही नीकाह- विवाह पंगती व दहेज ला फाटा देत पार पडले*

तिन्ही लग्नाचे वैशिष्ट म्हणजे मुली बघायला आले आणि लग्न करून गेले या लग्नात मुलीला कोणत्याही प्रकारचे श्रिधन अथवा दहेज म्हणून भांडी देण्यात आले नसून भोजन अथवा पंगत यांना सुद्धा फाटा देण्यात आला.

*तिघा वर वधू व नातेवाईकांचा होणार गौरव – फारूक शेख*

संपूर्ण समाजात व इतर बिरादरी मध्ये हा चांगला पायंडा पडावा म्हणून १४ फेब्रुवारी रविवार रोजी शिरसोली येथे जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली असून त्या ठिकाणी या तिघी नवर वधूंचा व त्यांच्या पालकांचा यथोचित गौरव करण्यात येईल तरी सर्व मानियार बिरादरी चे सभासद यांनी सकाळी ११ वाजता नशेमन कॉलोनी,जी.प. उर्दू शाळा, शिरसोली, येथे शेख इब्राहिम यांच्या घरी उपस्तिथी द्यावी असे आव्हान मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद व सचिव अझीझ शेख यांनी केले आहे.

 

http://https://youtu.be/OKyTqhdZD9o