Home विदर्भ हिंगणघाटच्या वसतिगृहातील 30 विद्यार्थी एंटीजन तपासणीमधे कोरोनाग्रस्त.!

हिंगणघाटच्या वसतिगृहातील 30 विद्यार्थी एंटीजन तपासणीमधे कोरोनाग्रस्त.!

235

योगेश काबंळे

वर्धा –  जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात नियंत्रणात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा झपाटयाने वाढतांना दिसुन येत आहे. आज शहरातील एका वस्तीगृहातील ३० विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून हे सर्व विद्यार्थी एंटीजन तपासणीमधे कोरोनाग्रस्त आढळून आले.
एकाचवेळी वसतीगृहात सुमारे ३० विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने आरोग्ययंत्रणासुद्धा ‘अलर्ट’ झाली आहे.
शहरातील एका नामवन्त समाजसेवी संस्थेद्वारा सदर वसतीगृह चालविण्यात येत असून येथील मुले शहरालगतच असलेल्या खाजगी शाळेत शिक्षण घेतात.
मिळालेल्या माहितीनुसार या वसतीगृहातील एका विद्यार्थ्यास कोरोना आजार झाला होता,त्यासाठी तो खाजगी डॉक्टरांकड़े उपचार घेत होता,त्याचे संपर्कात आल्यानेच इतर विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती आहे.एकुण ३९ मुलांची तपासणी केली असता त्यातील १० ते १६ वर्ष वयोगटातील ३० मुले पॉझेटीव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.विजय कुनघाडकर यांनी दिली.
अलिकडचे काळात तालुक्यातुन कोरोना हद्दपार झाल्याचे समजून जनता कोरोनाची भीती न बाळगता निर्धास्तपणे वागतांना दिसुन येत आहे.मास्क तसेच सोशल डिस्टनसिंग न पाळता सर्वत्र नागरिक रस्त्यावरती फिरत असल्याचा हा परिणाम आहे.