Home जळगाव के.के उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये माजी राष्ट्रपती डॉ.झाकीर हुसेन...

के.के उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये माजी राष्ट्रपती डॉ.झाकीर हुसेन जयंती साजरी.

203

रावेर (शरीफ शेख)

जळगाव येथील के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये 8 फेब्रुवारी रोजी देशाचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ, विचारवंत, लेखक तथा नवीन शिक्षानिती चे प्रेरक जामिया इस्लामिया विद्यापीठा चे संस्थापक तथा कुलगुरु डॉ.झाकीर हुसेन याची जयंती मुख्याध्यापक अकिल खान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डा.झाकीर हुसेन यांनी शिक्षण क्षेत्र,व देशा साठी केलेल्या विविध क्षेत्रातील कामाचा आढावा घेत मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.प्रा.मुश्ताक भिस्ती यांनी डॉ.झाकीर हुसेन नी विविध पदांवर राहुन देशा साठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विचार व्यक्त केले. शेख तबरेज यांनी डॉ.साहेबानी उर्दू फार्सी भाषा व साहित्य विकासा साठी दिलेल्या योगदाना ची नोंद करुन विनम्र असे व्यक्तिमत्व ज्यांनी देश हिता साठी केलेल्या कामा बद्दल ते इतिहासात सदैव कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.इयत्ता दहावी बद्दल ची विद्यार्थीनी कनीज फातेमा ने ह्याचा जीवन परिचय सादर केला. मझहरोद्दीन शेख,जमीला हमीद शेख हे उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार तबरेज शेख यांनी केले यशस्विते साठी शिक्षक वृन्द व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.