Home जळगाव सावखेडा खुर्द येथे सौ सविता नवले,यांची उपसरपंच पदी निवड…

सावखेडा खुर्द येथे सौ सविता नवले,यांची उपसरपंच पदी निवड…

95
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात लोकनियुक्त संरपच सौ बेबाबाई बखाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी तुषार चौधरी यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला तर ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील यांनी उपसरपंच पद रिक्त झाल्यानं सदर मिटिंगमध्ये उपसरपंचपदासाठी
सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वानुमते सौ सविता संतोष नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी अध्यक्ष अधिकारी संरपच बेबाबाई बखाल तर सचिव म्हणून ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांनी कामकाज पाहिले.

यावेळी लोकनियुक्त संरपच सौ बेबाबाई बखाल, ग्रा.प.सदस्य
तुषार चौधरी, जयेश चौधरी, इस्माईल तडवी, स्वाती बखाल, संगिता बखाल, नजमाबाई तडवी, शिपाई प्रदीप महाजन, शहादत तडवी, बैठकीत उपस्थित होते.

तर नवनिर्वाचित उपसरपंच सौ सविता नवले,यांचा सत्कार कार्याध्यक्ष विलास ताठे राष्ट्रवादी रावेर, एस टि पाटील ग्रामसेवक, संतोष नवले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका उपाध्यक्ष, दिपक भामरे, अभिनय नाईक, योगेश सैतवाल, रविंद्र महाजन, संजय बखाल, बाळू महाजन, आत्माराम चौधरी, राजेंद्र बखाल, ज्ञानेश्वर चौधरी, किरण पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ रावेर, किरण नवले, सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.