Home जळगाव बोदवड येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेला उपशिक्षणाधिकारीची  भेट

बोदवड येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेला उपशिक्षणाधिकारीची  भेट

232

 लियाकत शाह

जळगाव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी बोदवड येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेला प्रासंगिक भेट दिली व शाळा व विद्यार्थ्यांची आणी स्वध्या बाद्दल माहिती घेतली. बोदवड जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेचे कामा बद्दल स्तुती केली आणि
भविष्यात जी.प बोदवडची उर्दू कन्या शाळा एक आदर्श शाळा होण्यासाठी प्रेरित केले. यावेळी जी.प उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक शेख इकबाल फैयाजुद्दीन यांनी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले. यावेळी पवार यानी सांगितले की जिल्हा परिषदेतील प्रत्येक शाळा उत्कृष्ट असून त्यांचे शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांना दररोज शाळेचे हितासाठी अपडेट अर्थात अद्ययावत केले जावे, असे मत विजय पवार यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षक भावबंधू सहकार्याने कार्य केले पाहिजे जेणेकरुन भविष्यात शाळांना विशिष्ट आदर्श शाळेचा दर्जा नक्किच मिळेल. आत्ता आपण सर्व कोरोनच्या प्रभावापासून हळू हळू मुक्त होत आहोत आणि लवकर सर्व शाळा आणि महाविद्यालये सरकारच्या सूचनांसह प्रारंभ होत आहेत आणि जळगाव जिल्हा परिषदचे प्रतेक शाळा यांनी या नियमाचे पूर्ण समर्थन केले आणि कोरोनाकडून सर्व खबरदारी घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोदवड येथील जी.प उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक शेख इकबाल फैयाजुद्दीन, शाळेचे समन्वयक सादिक अली अहमद, शिक्षक नयामत शेख, सुजाउर रेहमान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक बोदवडचे सचिव मज़हर मुख्तार शाह आणि कोषाध्यक्ष जैनुल आबेदीन, जाविद शाह, आसिफ खान, साजिद शाह आणि शाळेतील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मुख्याध्यापक शेख इकबाल फैयाजुद्दीन यानी बोदवडचे गट शिक्षणाधिकारी बी.एन लाहसे यांचा मार्गदर्शनाचे आभार मानले आणी कन्या शाळेचे पुर्ण स्टाफ़ यांचा अमुल्य योगदान बाद्दल स्तुती केली.