Home पश्चिम महाराष्ट्र इंदुरच्या यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत भंडारा उधळला..!

इंदुरच्या यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत भंडारा उधळला..!

492

कोट-सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव जेजुरी पासुन जवळ असलेले होळ मुरुम असुन त्यांच्या आईवडीलांनी मल्हारी मार्तडांच्या आशीर्वादाने पुत्र झाल्याने मल्हारराव नाव ठेवले होते मल्हारराव होळकर सुभेदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा कायापालट करण्यासाठी कुलोपाध्याय नेमुन बांधकामे सुरू केली देवस्थान ला जमिनी इनामी दिल्या होत्या त्यांच्या नंतर सर्वांनीच जेजुरी साठी भरीव योगदान दिल्याने जेजुरी देवस्थान मोठे झाले तर होळकर राजघराण्यातील प्रत्येक वारसदार जेजुरीत दर्शनासाठी येत असे द्वितीय यशवंतराव होळकर यांच्या नंतर त्यांचे नातु यशवंतराव होळकर यांनी जेजुरीत येवून यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा उधळला आहे ही ऐतिहासिक घटना घडली असुन जेजुरीत नगरात हा अचानक आश्चर्याचा धक्का बसला जेजुरी देवस्थानच्या पुढाकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी चा पुतळा बसला असुन त्याचे अनावरण यशवंतराव होळकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रतिपादन विश्वस्त शिवराज झगडे यांनी मराठा टीव्ही शी बोलतांना केले.

माळव्याचे शेवटचे महाराजा द्वितीय यशवंतराव होळकर यांचे सख्खे नातु श्रीमंत यशवंतराव शिवाजीराव होळकर यांनी आज दि.24 रोजी सायं 5:30 वा जेजुरीत उपस्थित राहून यळकोट यळकोट जय मल्हार करीत मल्हारी मार्तडांची पुजा केली.

जेजुरीत श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला असुन पुतळ्याचे अनावरण दि.13 फेब्रुवारी रोजी यशवंतराव होळकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याने त्यांनी जेजुरीत उपस्थित राहून पुतळ्याची पाहणी केली तर सर्व पाय-या चढुन यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत जेजुरीत पुजा करुन तळी उचलली तर भंडारा खोबरं उधळून मार्तंड भैरवाचे चांगभलं म्हणत खांडा उचलला होता दर्शनानंतर यशवंतराव यांनी जेजुरीच्या जनतेशी संवाद साधुन सर्वांना अभिवादन करतांना
होळकर राजघराण्यांच्या युवराजाला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती तर होळकर वाड्यात जागरण गोधंळ पार पाडतांना मानाची वारीही यशवंतरावांनी मागीतली देवपूजा व जागरण गोधंळादरम्यान यशवंतरावांच्या खांद्यावर घोगंडी व होळकरी पगडी परिधान केलेली होती.

जेजुरी चे मल्हारी मार्तंड देवस्थान होळकर राजघराण्याचे कुलदैवत असुन सुभेदार मल्हारराव होळकर, तुकोजीराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांनी जेजुरीचे मल्हारी मार्तंड मंदिर भव्य दिव्य निर्माण करण्यासाठी नगारखाना मंदिराची तटबंदी, मुख्य गाभारा, दिपमाळ, तसेच पाय-या सह तलावाची निर्मिती केली होती जेजुरी समृध्द करण्यासाठी होळकरांचा मोठा वाटा आहे. द्वितीय यशवंतराव होळकर यांनी राजगादीवर बसण्याआधी मल्हारी मार्तडांचे जेजुरीत येवून दर्शन घेतले होते त्यांच्या नंतर त्यांचे नातु आज जेजुरीत दाखल झाल्याने अखिल महाराष्ट्र धनगर समाज संस्थानने त्यांच्या हस्ते पुजा व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन होळकर वाड्यात केले होते होळकरांच्या नातवाचे आगमन होणार असल्याने होळकर वाडा सजवून,मंडपसह रोषणाई करण्यात आली होती.

यावेळी होळकरांचे मामा जहागीरदार अमरजीतराजे बारगळ,अखिल महाराष्ट्र धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष अकुंशराव भांड,होळकर रियासतचे अभ्यासक रामभाऊ लांडे,कुलोपाध्याय श्री खाडे तसेच देवस्थान चे श्री काटकर संचालक शिवराज झगडे सह संस्थेचे सचिव सुनील शेंडगे,गोविंदराव कवितके,पुणे शहराध्यक्ष चंद्रकांत मोरे,रमेश नाचण,किरण हुगे,सुरेश भांड,संपादक गणेश पुजारी उपस्थित होते तर यशवंतराव यांच्या समवेत असलेल्या सौ.कुतांबाई घुले,डाँ.श्वेता चौधरी उपस्थित होत्या