Home बुलडाणा तात्पुरत्या कारागृहात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तात्पुरत्या कारागृहात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

289

तात्पुरत्या कारागृहात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ,

बुलडाणा येथील दुसरी घटना ,

सर्वत्र उडाली खळबळ ,

अमीन शाह

बुलडाणा :- बालसुधारगृहात दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटनाची शाही वाळत न वाळत त बुलडाणा येथे धक्का दायक दुसरी घटना घडली आहे ,

आज चार जानेवारीला सायंकाळी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कोरोनामुळे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या जिल्हा कारागृहात एका महिलेने आत्महत्या केली आहे जिल्हा कारागृहाच्या बाजूलाच असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत कोरोनामुळे आधी चौदा दिवस आरोपींना या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येते ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या सिंहगड या इमारतीत हे तात्पुरते तुरुंग बनविण्यात आले आहे येथे रायपूर पोलिसांनी पकडलेल्या धामणगाव बडे येथील तरुणी स ठेवण्यात आले होते तिने येथे असलेल्या शावर ला ओढणी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला मात्र अधिक काही सांगण्यात असमर्थता व्यक्त केली लवकरच पोलीस वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी येणार आहेत व पुढील तपास करून या महिलेने आत्महत्या का केली ते तपासाअंती उघड होणार आहे ,मृतक तरुणीचे नाव अकिया बी मूनाफ खान होते ती भा , द , वि , 394 च्या एक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होती