Home बुलडाणा देऊळगावराजा ते शेगाव पायी दिंडी सोहळा यावर्षी रद्द

देऊळगावराजा ते शेगाव पायी दिंडी सोहळा यावर्षी रद्द

291

 

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि श्रींच्या संस्थान कडुनआलेल्याआदेशांचे विश्वस्तांनी केले।सन्मानपुर्वक पालन

प्रतिनिधी:रवि जाधव

देऊळगाव राजा:दरवर्षी प्रमाणे 7 जानेवारी रोजी सुर्यास्त होताच शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर येथुन निघणारा हा पाच दिवसाचा भक्तीमय पालखी सोहळा 11 जानेवारीला श्रींच्या पावन नगरीत पोहचत असतो. यावर्षी कोरोनाच्या पाद्रुर्भाव असल्याने हा सोहळा रद्द करत असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
आपल्या ऐतिहासिक महाराष्ट्राला सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिकतेचा वारसा आहे हा वारसा आजही महाराष्ट्र मोठ्या उत्सवाच्या,धार्मिक संस्काराच्या माध्यमातुन देशाला एक प्रकारे धार्मिकतेची दिशा देण्याचे काम करीत आहे.
धार्मितेची परंपरा जोपसण्यात अनेक धार्मिक स्थळांचे ही मोठे योगदान आहे त्यात अनेक साधु-संतानी महाराष्ट्राच्या मातीला दाखवलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आधुनिक युगात पुढे नेण्यात ही राज्यातील वारकरी मागे नाहीत आणि धार्मिक उत्सवाला प्रेरणा आणि योग्य दिशा देणारेही अनेक धार्मिक संस्थान महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. आणि या मातीला असलेली वारकरी संप्रदायाची ‘आस’ जोपासण्याचा आमचा लहानसा प्रयत्न म्हणुन आम्ही “देऊळगाव राजा ते शेगांव” पायी दिंडी सोहळ्याचे दरवर्षी पाच वर्षापासुन नियोजन करीत होतो.त्या दिंडी सोहळ्याच्या नियोजनामध्ये आम्हाला अनेक नागरीकांकडुन स्वःईच्छेने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात मदत मिळत होती ती धार्मितेच्या भावनेतुन मिळणारी मदत आमच्या वारकऱ्यांच्या आत्मविश्वासाला गतिमान करणारी आणि फुलांच्या मधुर सुंगधाप्रमाणे मनात साठवुन रहावी अशी होती.
परंतु यावर्षी संपुर्ण जगात कोरोना सारख्या जागतिक संसर्गजन्य रोगाने थैमान गातले असुन प्रत्येक देश आणि त्यातील राज्य यामहामारीच्या रोगाशी दोन हात करतांना युध्द पातलीवर प्रयत्न करतांना दिसत आहे. प्रसंगी अनेक राज्य आणि काही देश काही महिन्यांसाठी पुर्णत: लॉकडाऊन होते.यात आपले शक्तीस्थळ असलेले धार्मिक देवस्थानही शासनाच्या आदेशाने बंद होती ती आता शासनाच्या नियमाप्रमाणे हळुहळु उघडली आहे.त्यांना शासनाने अनेक नियमांचे निर्बंध घालुन दिले असुन आपला दरवर्षी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून होणारा दिंडी सोहळा यावर्षी नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याने आणि श्री संत गजानन महाराज संस्थान (शेंगाव)च्या आग्रही मागणीमुळे रद्द करण्याचा निर्णय आमच्या दिंडी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने घेतला असुन, संस्थानच्या आग्रही मागणीला आणि विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाला सकारात्मक हेतुने सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आम्ही समजतो.
लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णत: संपुष्टात येऊन तो इतिहासात जमा व्हावा अशी प्रार्थना गजानन महाराज चरणी करतो आणि पुढील वर्षीचा दिंडी सोहळा त्याच भरगच्च जोमाने आणि धार्मिक देखाव्याच्या साक्षिने होईल अशी आशा करूया..