Home विदर्भ क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती कर्यक्रम व विध्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती कर्यक्रम व विध्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

48
0

यवतमाळ / घाटंजी,  (तालुका प्रतिनिधी) – माळी समाज बहुउद्देशीय संस्था 19673 घाटंजी चे वतीने कोविड 19 चे सर्व नियम पाळून दि 3 जानेवारी 2021 ला क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती चा कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर लांजेवार यांचे घरी जेसीस कॉलनी घाटंजी येथे संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव यांचे उपस्थितीत सम्पन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती विजयाताई धस. (दिलासा संस्था घाटंजी) भूषविले.श्री उदयसिंग आडे ( लाका बहु उद्देशिय संस्था घाटंजी ), श्री धनंजय बंगळे ( उपाध्यक्ष मा. स.संस्था घाटंजी),श्री चंद्रकांतजी वानखडे ( प्राध्यापक ),श्री रामभाऊजी किरणापूरे, सौ उजवला मोहूर्ले सौ दुर्गा किरणापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व पाहुणे मंडळी यांनी प्रतिमेचे पूजन केले.सन 2020 मध्ये वर्ग 10 वा मधून उत्तीर्ण झालेल्या कु सृष्टी उपरीकर (94%) ,कु दृष्टी उपरीकर (94%),कु दीक्षा बनकर (73%).कु गुंजन सोनूले(74), कु स्नेहा आदेे (73%),हर्ष पेटकुले (85%),आशिष मोहूर्ले(78%) व वर्ग 12 वी मधून कु नेहा पा निकोडे (81%) व शिष्यवृत्ती परीक्षेत ऊत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र झाल्याबद्दल शोल्क किरणापूरे या सर्व विद्यार्थी शिल्ड व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.श्री गजेंद्र ढवळे (राष्ट्र निर्माण विचारधारा यांचे अतिशय सुदंर असे सावित्रीमाई फुले यांचे जीवनावर आधारित व्याख्यान झाले. श्री अनिल वाढोनकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव राजू उपरीकर यांनी केले. कार्यक्रम चे यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले .