Home विदर्भ ग्रेटर कैलाश नगर संमेक कॉलनी अमरावती येथील नागरिक रस्ते व नाल्या करिता...

ग्रेटर कैलाश नगर संमेक कॉलनी अमरावती येथील नागरिक रस्ते व नाल्या करिता धडकले मनपा उपायुक्त यांच्या दालनात

218

मनिष गुडधे

अमरावती – ग्रेटर कैलाश नगर संमेक कॉलनी अमरावती या परिसरामध्ये ये जा करण्यासाठी रस्ते अतिशय नादुरुस्त आहे त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक लहान बालके यांना परिसरात वावर करण्यास अतिशय जिकरीचे झाले आहेत.

 

https://youtu.be/WY1V-jSZeyg

 

 

दि ग्रेटर कैलाश नगर संमेक कॉलनी अमरावती या परिसरात जवळपास 80 ते 85 टक्के नागरिक हे अनुसूचित जाती मधील असून जाणीवपुर्वक परिसरातील रस्ते दुरुस्ती व रस्त्याचे डांबरीकरण याकडे मनपा अमरावती प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे मागील काही दिवसांमध्ये परिसरातील रस्त्यावर खड्डे असल्याने अपघात झाले असून अनेकांना शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत विशेषता काहींना मणक्याच्या आजाराने ग्रासले गेले आहेत
परिसरातील आजूबाजूला असलेल्या नगरांमध्ये रस्ते आणि डांबरी करण्याची उत्तम व्यवस्था निदर्शनात येते तुलनात्मक दृष्ट्या अधिक कैलास नगर संमेक कॉलनी अमरावती या परिसरातील रस्ते विकासाकडे मनपा प्रशासन जाणतेपणाने दुर्लक्ष करीत असल्याची भावना वाढीस लागत आहे
ग्रेटर कैलाश नगर समता कॉलनी अमरावती हे लेआउट 1982 ते 83 ला मंजूर करण्यात आलेल्या आहेत तेव्हापासून रस्ते विकास आराखडा आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत परिसरातील रस्त्याच्या विकासाकरिता विकास अनुदान अनेकदा प्राप्त झालेले असेल मात्र अनुदानाच्या तुलनेत प्रत्यक्ष रस्त्याची अती दुर्लक्ष झालेली निदर्शनात येते त्यामुळे परिसरातील समजता नागरिकांकडून रस्ते दुरुस्ती व काँग्रेट करण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देऊन कामास विनाविलंब सुरुवात करावी याकरिता याकरिता आज दिनांक 22 12 2020 रोजी मनपा उपायुक्त एस पाटील यांना निवेदन
देण्यात आलेव पंधरा दिवसाच्या आत जर रस्त्यालाच कामाला सुरुवात झाली नाही तर उपोषणाचा इशारा समस्त नागरिकाकडून देण्यात आला
माननीय मनपा आयुक्त साहेबांना नम्र निवेदन
आमच्या नगरवासी यांच्या समस्या समजून घ्या व खालील प्रश्नांची उत्तरे द्या
प्रश्न क्रमांक 1

आमच्या तीनही नगरसेवक चोरीला गेलेले आहेत ते मिळतील का
प्रश्न क्रमांक 2

आमच्या 35 एकराच्या लेआउट मधील 37 प्लॉट विकून आलेला करावयाचा निधी गेला कुठे
प्रश्न क्रमांक 3

मनपा चा विकास निधी गेला कुठे
प्रश्न क्रमांक 4

दलित वस्ती विकास निधी गेला कुठे
प्रश्न क्रमांक 5

विशेष विकास निधी गेला कुठे
प्रश्न क्रमांक 6
दहा वर्षात मूलभूत सुविधा का नाही
प्रश्न क्रमांक 7

दहा वर्षात रस्ते सुद्धा का नाही
प्रश्न क्रमांक 8

डांबरीकरण सिमेंट रस्ते का नाही
प्रश्न क्रमांक 9

खड्ड्यातील रस्त्यामुळे हजारो नागरिकांना मणक्याचे व हाडाचे आजार होत आहे याला जबाबदार कोण
प्रश्न क्रमांक 10

आपण प्रत्येक भागात दौरा करून समस्या जाणून का घेत नाही
प्रश्न क्रमांक11

टॅक्स वसुली शक्तीची पण विकास शक्तीचा का नाही
प्रश्न क्रमांक 12

निकृष्ट दर्जाचे काम करणारे भ्रष्ट अधिकारी कोण
प्रश्न क्रमांक 13
रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात दुरुस्त का होत नाही
प्रश्न क्रमांक 14

तुलनात्मक दृष्ट्या मागासवर्गीय वस्तीचा विकास का होत नाही
निवेदन देतेवेळी
आकाश बनसोडे जय गडलिंग सुशिल इंगळे सुबोध काळे अर्जुन वरठे सुशील पाटील योगेश कांबळे सेवानंद वाकोडे प्रमोद राऊत गोपाल अभ्यंकर