Home मराठवाडा शरीर सोडल्यानंतरही संन्याशी बाबांच्या आत्म्याला शांती मिळेना

शरीर सोडल्यानंतरही संन्याशी बाबांच्या आत्म्याला शांती मिळेना

141
0

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

जालना –  जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील उत्तरेश्वर महादेव संस्थानचे मठाधिपती महंत डॉ.दीगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज यांच्या आकस्मिक निधनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे, जनतेत प्रचंड दुखवटा निर्माण झाला आहे.
महंत डॉ.दिगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव येथील उत्तरेश्वर महादेव मंदिर सानिध्यात मागील आठ वर्षांपासून वास्तव्यास होते.उत्तरेश्वरमंदिर आणि परिसराचा संपूर्ण कायापालट केला.गावोगावी लोकांना विश्वासात घेऊन देवीदेवतांची मंदीर उभारणे,मुर्ती प्रतिष्ठापना करणे , गोदावरी परिक्रमा करणे, आयुर्वेदीक उपचार पद्धतीने गोरगरिब रूग्णांवर मोफत उपचार करणे, तरूणांना व्यसनमुक्त करून सन्मार्गाला लावणे आदी जनहिताची कामे केली.महंत डॉ.दिगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये आदराचे,श्रद्धेचे स्थान बनले होते. परंतु १५ डिसेंबर रोजी महाराजांनी जीवनयात्रा संपवली आणि सर्वांना धक्का दिला.महंत दिगंबर श्रीकृष्ण पुरी महाराजांना देहांतापुर्वी जीवंतपणीच यातना भोगाव्या लागल्या, महाराज स्वत:शीच झगडत होते.मृत्यू पश्चात घाटी रुग्णालयात चार दिवस मृतदेह बेवारस अवस्थेत पडून राहिला.उक्कडगाव येथे उत्तरेश्वर महादेव मंदिरासमोर महाराजांना समाधी देण्यात आली.अंतीम संस्कार प्रसंगी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर एका महंतांनी ग्रामस्थांवर आरोप केल्याने वादाची ठिणगी पडली.वादावादीत दोन दिवस पुरी महाराजांच्या समाधी स्थळाकडे कुणी फिरकलेही नाही.वादग्रस्त विधान केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.महंतांनी ग्रामस्थांची माफि मागावी हा संदेश शनिवारी महंतांनी धुडकावून लावला.
बाहेरच्या लोकांनी संन्याशी बाबांच्या विधीकार्यात सहभागी होवू नये अशी उक्कडगाव येथील ग्रामस्थांनी तटस्थ भूमिका घेतली होती.संदर्भीय महंत आणि उक्कडगाव येथील ग्रामस्थांमध्ये समज , गैरसमजातून मतभेद झाले असल्याचे दिसून आले. पुरी महाराजांना देहांतापूर्वी मरणासन्न यातना भोगाव्या लागल्या ,शरिर सोडल्यानंतरही त्यांच्या समाधीची अवहेलना होत असेल तर महाराजांच्या आत्म्याला शांती मिळेल काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.