Home विदर्भ कोरपना – वणी मार्गावर पिकअप उलटली. सोळा जण जखमी ; हेटी गावाजवळ...

कोरपना – वणी मार्गावर पिकअप उलटली. सोळा जण जखमी ; हेटी गावाजवळ ची घटना

42
0

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

चंद्रपुर –  वरोराकडे जाणारी पीक अप उलटल्याने पिक अप मधील सात जण गंभीररीत्या जखमी तर नऊ जण किरकोळ रित्या जखमी झाले. ही घटना मंगळवार ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास कोरपना – वणी मार्गावरील हेटी गावाजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार , वरोरा तालुक्यातील पारधी टोला ( चिणोरा ) येथून कुलदेवतेच्या पूजन कार्यक्रमाला कोरपना तालुक्यातील पारधीगूडा येथे आले होते. दरम्यान गावाला पिकअप क्र. एम एच ३१ ,सी क्यू ७४८२ ने
परत जात असता ही घटना घडली. यात बंडु भिमराव दडमल (२८) , संगीता शेरकूरे (३५), शांता मोरेश्वर शेरकुरे (४०) , सुरेखा संतोष ननावरे (४६),सीमा राजू दडमल (३५), अचल संतोष नन्नवरे (११), ज्योती शेरकूरे (३५) हे गंभीररीत्या जखमी तर किरकोळ जखमी मध्ये शारदा सदाशिव ननावरे (३७) , वेणूबाई ननावरे (६३), रंजीत गजानन चौधरी (३०) , काजल रितेश ननावरे (१६), दशरथ ननावरे (७०), नंदा शेरकुरें (५०), जितेंद्र ननावरे(२८), वनिता शेरकुरें (४२) , फुलाबाई भोसरे (५५) सर्व राहणार पारधी टोला त.वरोरा आदींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिस यांनी घटनास्थळावर दाखल होत. जखमींना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल केले. यातील सात जणांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर
करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरूण गुरनूले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना
पोलिस करीत आहेे.