Home राष्ट्रीय दंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची...

दंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली

447

ईकबाल शेख

वर्धा / तळेगांव ( शा.पंत) :– नियमांच्या अंमलाच्या नावावर सध्या शहरात वाहतुक पोलीसांची चांगलीच अरेरावी वाढली आहे. तळेगांव पासुन आर्वीकडे जाणार्‍या एक किलोमीटर अंतरावर उभे राहुन व नागपूर अमरावती रोडवर वाहतुक पोलीसांकडुन दंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक दिल्या जात असल्याची ओरड नागरीकांकडुन होत आहे.तसेच शेतात जाणाऱ्या शेतकरी व त्यांचे सोबत असणाऱ्या गडी माणसाला सुध्दा हे पोलीस दादा माफ करायला तयार नाही.नव्याने ठाण्यात काही नवीन अधिकारी व कर्मचारी बदलून आले व त्यांनी दंडाच्या नावावर कारवाया करणे चालू केले.त्यांनी केलेल्या कारवाया मात्र गोर गरीब जनतेला त्रास देण्याच्या आहेत . सध्या एस टी बस चे शेड्युल खुप कमी आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आटो शिवाय पर्याय नाही मात्र पोलीस दादांनी आपला मोर्चा हा ऑटो चालका कडे वळविला दिसत आहे.कोरोणा चा पिरेड असल्यामुळे कोणतेही काम नसतांना काही युवक ऑटो चा धंदा करीत आहे.आणि जेमतेम दोनशे ते तीनशे रुपये ते दिवसाला मोठ्या मुश्किलीने कमावतात मात्र हे पोलीस दादा त्यांना अवा क्या बाहेर दंड देत आहे.आज काही ऑटो चालकांनी मात्र कमालीची नाराजगी बोलून दाखविली.आणि आम्ही काय आता दोन नंबरचे धंदे करावे काय ?असे बोलून दाखविले.याकडे वरिष्ठांनी लक्ष देत पोलीसाला साैजन्याचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.
वाहतुकीला नियम लावण्याकरीता म्हणुन वाहतुक पोलीसाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु रोडने आपल्या वाहनांने जाणार्‍या येणार्‍या वाहन चालकाला अडवुन त्यांना चलान देण्याच्या नावावर त्यांच्याशी असभ्य भाषेत संभाषण केल्या जात असल्याचा प्रकार सध्या घडत असल्याचे नागरीक बोलत आहे. रस्त्याने जाणारा प्रत्येकच व्यक्ती हा गुंड नाही. याची जाणीव कदाचीत या पोलीसांना नसावी असा प्रकार यातुन दिसत आहे. अडविलेल्या व्यक्तीने दोष विचारताच त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात येते. नाईलाजाने काही सभ्य नागरीक यांच्या नादाला कोणी लागावे असे मनोमन बोलुन चुपचाप चलान घेवुन काढता पाय घेतात.
तळेगांव परीसरात वाहतुकीला नियम नाही हे काही नवे नाही. याला काहि प्रमाणात वाहतुक पोलीसच जबाबदार असल्याचे दिसुन येत आहे.आता नव्याने दाखल झालेले काही पोलीस दादा ट्राफिक पोलीस आहे की नाही हेही समजण्या पलीकडे आहे.कारण त्यांना ट्रॅफिक पोलीसांना असणारा ड्रेस ते घालून दिसत नाही.आणि दंड सुध्दा इतका ठोठावतात की समोरचा गाडी चालक पूर्णतः घाबरून जातो.आणि दंड भरण्या इतके पैसे नाही म्हटले की गजानन नामक पोलीस दादा चा पारा एवढा वाढतो आणि मग त्यांची कायद्याची भाषा चालू होवून जात शिवीगाळ सुरू होते.हे कितपत योग्य आहे. काही अल्पवयीन तरुन ट्रिपल शिट शहरातुन सुसाट वेगाने वाहने चालवुन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कार्यवाहि होताना दिसत नाही. फक्त सज्जनांसाठिच नियम आहे व दुर्जनांना सर्वकाही मुभा आहे काय? असा प्रश्न आता सामान्य नागरीक उपस्थित करीत आहे. व्यक्ती बदलताच नियम बदलतो परीनामी आज एक नियम असतो तर नतंर तोच नियम नियमाचा भंग ठरतो. यामुळे पोलीस विभागाच्या वतीने नागरीकांशी साैजन्य पुर्वक संबंध निर्माण करीत त्यांना नियम सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.

उड्डाण पुलाखाली उभ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

• बसस्थानक चोैकात उड्डाण पुलाखाली वाहणे उभी राहत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्मान होते परंतु तिथे थांबुन वाहतुक सुरळीत करण्याकडे वाहतुक पोलीस लक्ष नदेता गावापासुन एक किलोमीटर अंतरावर सुनसान जागी उभे राहुन आपले खिसे गरम करण्यातच व्यस्त असता