
भाग 1
सलमान मुल्ला
उस्मानाबाद / कळंब – शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध धंदे जोरात चालू आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच मटका, जुगार चालु असतानाही पोलीस याकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करत आहेत.
कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, चोऱ्या,दहशत, वाळू तस्करी, गावठी कट्टे या माध्यमातून सुरू आहे.
कळंब पोलीस मात्र आंधळ्य़ाची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे कळंब पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.
याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस निरीक्षकाकडून तक्रारदारांनाच धमकावले जाते.
गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी बनावट दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. तसेच शहरात गुन्हेगारी घटना घडत आहेत; मात्र तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे कागदावर गुन्हे कमी दिसत आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. असे असले तरी शहरातील रात्रीच्या वेळी घडणार्या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. रात्रीच्या काळोखात कळंब नगरीमध्ये गुन्हेगारांचाच सुळसुळाट सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
रात्रीची गुन्हेगारी कमी करण्याचे एक आव्हान पोलीसांसमोर उभे ठेकले आहे. ,
परंतु या परिस्थितीतून मार्ग काढून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान कळंब पोलिसा समोर आहे. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी डोके वर काढत आहे.
मात्र, केवळ किरकोळ कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पोलीसांकडून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तालुक्यात गुन्हेगारीचे मोठे जाळे पसरत चालले आहे. लूटमार, मारामाऱ्या, चोऱ्या या घटनांमुळे अधिक बेजार झालेल्या नागरिकांना आता खून, दरोडा याची धास्ती वाटू लागली आहे. तालुक्यातील वातावरण दूषित होत आहे. राजकीय वैमनस्य आणि आर्थिक लाभापोटी गुन्ह्याचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे बोलले जाते.नव्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असतानाच स्थानिक गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी शक्ती खर्च करावी लागणार आहे. सट्टा, चोरी, जुगार, मटका, रोड रोमिओ, लुटमार, अवैध वाहतूक, बेकायदा दारू विक्री यांसारख्या कायद्याच्या तुलनेत लहानसहान गुन्ह्य़ांप्रमाणेच अलिकडच्या काळात झालेली वाढ तसेच गटांमध्ये होणारी धुसफूस ते गंभीर हाणामाऱ्या, खून, दरोडे, वाढता सायबर क्राईम या बाबत अलर्ट राहावे लागणार आहे. अवैध धंद्यांपासून केवळ जामखेड शहरच सुटले नाही तर तालुक्यातही बिनदिक्कतपणे मटका, जुगार खेळला जात आहे.
तालुक्यातील मोहा,डिकसळ,हसेगाव,इटकूर,आदी भागात सध्या हा व्यवसाय जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे त्या त्या भागातील पोलीस अधिकारी, बीट जमादार यांना मॅनेज करून हा व्यवसाय राजरोसपणे चालविला जातो. खुलेआम हा व्यवसाय चालत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून चोर्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.











































