Home जळगाव मुव्हमेंट फॉर पीस & जस्टिस च्या स्वयंसेवकांनी रावेर तालुक्यातील आरोग्य केंन्द्राच्या केला...

मुव्हमेंट फॉर पीस & जस्टिस च्या स्वयंसेवकांनी रावेर तालुक्यातील आरोग्य केंन्द्राच्या केला सर्वे

148

रावेर (शरीफ शेख) 

एम. पी. जे रावेर शाखा तर्फे संपूर्ण राज्यात २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत “राईट टू हेल्थ” उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत रावेर, निंभोरा, खिर्डी, व ऐनपूर या गावामध्ये जाऊन एम. पी. जे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंन्द्र, ग्रामीण रुग्णाल्या जाऊन तेथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची संख्या, उपलब्ध साहित्य, औषधी या सर्व गोष्टींची माहिती घेतली. यावेळी एम. पी. जे रावेर तालुका अध्यक्ष फिरोज शेख, शहर अध्यक्ष मोईन शेख, सादिक अब्दुल समद, आसीफ शेख, सैय्यद सलमान अली, साबीर भाई (निंबोल) , जाकीर खान , उपस्थित होते.
या सर्वेक्षणात ज्या आरोग्य केंद्रात कर्मचारी सुविधा, औषधी व आवश्यक साहित्य यांची कमतरता आहे. त्या विषयी वरिष्ठ पातळीवर माहिती देऊन या संमस्या सोडविण्यासाठी एम. पी. जे प्रयत्न करणार आहे.
असे तालुका अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले.