Home विदर्भ कोरोना काळामध्ये सुद्धा अंडवृद्धी शस्त्रक्रियेचा शुभारंभ…!

कोरोना काळामध्ये सुद्धा अंडवृद्धी शस्त्रक्रियेचा शुभारंभ…!

183

अमरावती / मोर्शी – राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रनमले यांच्या नेतृत्वाखाली तसेच अकोला येथील सहाय्यक संचालक डॉ कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली व हत्तीरोग अधिकारी डॉ जुनेद, हिवताप अधिकारी डॉ शरद जोगी, अकोला येथील सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री मुंद्रे, तांत्रिक विभागाचे शिबिराचे नियोजन कर्ते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री प्रविण चकुले व आरोग्य सेवक श्री प्रकाश दातीर व सुधाकर चोपकर तसेच कीटक समहारक श्री अनिल जाधव, श्री राहुल कोल्हे व येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री दिनेश भगत यांच्या उपस्थितीत येथील वैद्यकीय अधीक्षक तथा सर्जन डॉ विजय कळसकर यांनी त्यांच्या सहकारी डॉ पूजा मेंढे यांच्या सहकार्याने अंडवृद्धी शिबिराचे 19 ऑपेरेशन करून शुभारंभ केला.

याप्रसंगी डॉ भंडारी, सहाय्यक संचालक यांनी प्रत्येक हायड्रोसिल रुग्णांची विचारपूस करून त्यांना त्यांच्या संपर्कातील हायड्रोसिल रुग्णांना शस्त्रक्रिये करीता प्रवृत्त करण्याकरिता आवाहन केले. त्यानंतर त्यांनी येथील सर्जन डॉ विजय कळसकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर डॉ जुनेद हत्तीरोग अधिकारी यांनी डॉ भंडारी सहाय्यक संचालक यांची विशेष उपस्थिती लाभल्याबद्धल त्यांचे सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व लवकरच जिल्हा योग्य नियोजन द्वारे सहकारी यांच्या सहकार्याने हा जिल्हा अंडवृद्धी मुक्त करू असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता येथील येथील आरोग्य सहाय्यक श्री विनायक नेवारे, आरोग्य कर्मचारी श्री विनय शेलुरे , श्री कडू , श्री बेहरे, श्री भोसले, तसेच वलगाव येथील आरोग्य सहाय्यक श्री माहुरे, आरोग्य कर्मचारी श्री बरडे, व शिराळा येथील आरोग्य सहाय्यक श्री कांबळे, आरोग्य कर्मचारी श्री केळकर, श्री आराध्य आणि श्री मनोहर व नेर पिंगळाई येथील आरोग्य सहायक श्री.गवई, आरोग्य कर्मचारी श्री.प्रफुल्ल दिवे,श्री.भोजने,श्री.वाकोडे उपस्थित होते.