Home विदर्भ शेतकऱ्यांनी चक्क बैल बंडी वर चढून केली तूर पिकाची फवारनी

शेतकऱ्यांनी चक्क बैल बंडी वर चढून केली तूर पिकाची फवारनी

88

योगेश कांबळे

वर्धा –  जिल्हातील हिगंणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील युवा शेतकरी रंजीत गुणवंतराव ढगे या शेतऱ्यानी चक्क शेतात बैल बंडी वर चढून तुर पिकावर फवारणी केली .हा सर्वत्र परीसरात चर्चचा विषय ठरला आहे .

या वर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूरी लागवड केल़ी होती मात्र सोयाबीन ला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन पिक उपडून फेकले त्यामूळे फक्त तूरच पिक पाच ऐकर शेतात ठेवली होती या वर्षों पाणी ज्यास्त आल्याने तूरीचे पिकात खुप वाढ झाली आहे. फवारणी करन्या साठी तूरीची वाढ माणसा पेक्षा ज्यास्त असल्याने मजूर फवारणी मारन्या साठी तयार नसल्याने तुर पिकावर किड व अळी आली आहे.
त्या मूळे तूर पिक नस्ट होऊ नये या साठी युवा शेतकरी रंजीत ढगे याने जूगाड टेकनॉक्वॉजी व नवीन शक्कल लढऊन स्व:ताची बैल बंडी जुंपुन वडिल गुणवंत ढगे यांना सोबत घेऊन शेतातील तूर असलेल्या पिकावर बैल बंडी वर चढुन संपूर्न पाच ऐकर शेतात फवारनी केली व आलेला अळयांच्या अटॅक पासुन शेतातील पिकांचे संरक्षन केले . दूसऱ्यावर अवलंबून न राहता आलेल्या प्रत्येक परिस्थीतीवर मात करन्याचा संदेश रंजीत ढगे या युवा शेतकऱ्यांनी दिला आहे. अल्लीपुर व आजुबाजूच्या परीसरात माञ हा सर्वत्र चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला आहे .