Home महत्वाची बातमी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावावर उद्या होणार शिक्का मोर्तब ,

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावावर उद्या होणार शिक्का मोर्तब ,

929

 

 

कोणाची लागू शकते वर्णी , ??

 

मुंबई ,

.बुधवारी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजूरी दिली जाणार असून ती यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे . त्यामुळे यावर राज्यपाल आपली सहमती दर्शवणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे . गेल्या काही दिवसांत सत्ताधारी विशेषकरून शिवसेना आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळाला होता.त्यामुळे १२ सदस्यांच्या नावांना मंजूरी देण्याबाबत राज्यापाल काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल .
दरम्यान , एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा आहे .परंतू खडसेंनी आपल्याकडे कोणतीही अपेक्षा केलेली नाही . पक्षात कोणतेही बदल केले जाणार नाही , असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले होते . तर आता राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव दिला जाणार असून त्यात राष्ट्रवादी कडून एकनाख खडसेंचे नाव असणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे , सचिन अहिर , मिलिंद नार्वेकर , युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल , माजी मंत्री अर्जुन खोतकर , यांच्या नावाची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी , गायक आनंद शिंदे , उत्तमराव जानकर , आदिती नलावडे , शिवाजी गर्जे , काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत , युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे , मोहन जोशी आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या नावाची चर्चा आहे .