Home मराठवाडा शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय...

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

836

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना –  जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून.सर्व दुष्काळी उपाय योजना त्वरित करण्यात याव्यात,शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रु पीक नुकसानी पोटी आर्थिक मदत द्या..वीज बिल माफ करा,
पीक विमा रक्कम त्वरित वाटप करा, शेतमजुरांना व ग्रामीण कामगारांना रोहयो तुन कामे उपलब्ध करा.600 रु मजुरी व किमान 200 दिवस काम द्या,
कामगार कार्यालयाच्या चुकीमुळे त्रुटीत आलेल्या बांधकाम कामगारांचे कोविड-19 चे 5000 अनुदान त्वरित वाटप करा.दुष्काळाची परिस्तिथी लक्षात घेऊन आणखी 5000 रु अनुदान द्या,बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी व नूतनीकरण प्रकिया किचकट असल्याने मंडळाचे कामकाज बंद पडले आहे, त्यामुळे हजारो कामगार योजनांपासून वंचित आहेत,तेव्हा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीने कामकाज सुरू करा. बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रसूती,विवाह,पाल्यास शिष्यवृत्ती अशा विविध योजनांची प्रस्ताव त्वरित निकाली काढून त्यांना त्याचा लाभ द्या,
कोव्हिड19 ची परिस्तिथी लक्षात घेऊन बांधकाम कामगारांच्या पाल्यास ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट फोन आणि लॅपटॉप देण्यात यावेत,
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा, सर्व अल्पभूधारकशेतकरी,शेतमजूर,आणि असंघटित कामगारांना दरमहा प्रति व्यक्ती रेशनवर 10 किलो धान्य मोफत वाटप करा,इन्कम टॅक्स लागू नसलेल्या सर्वकुटुंबाना किमान 7500 रु आर्थिक मदत देण्यात यावी,निराधारांच्या अर्थसहाय्य योजनाचे वितरण करण्यात,नवीन प्रस्ताव निकाली काढण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करा,निराधारांच्या अर्थसहाय रक्कम किमान दरमहा 3000 रु करण्यात यावी
या व इतर मागण्यासाठी किसान सभा व बांधकाम कामगार संघटना (लाल बावटा)च्या वतीने राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.आज दोन्ही संघटनांची तालुका कमिटी संयुक्त बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये,केंद्र सरकारनेही भरीव मदत द्यावी,आज शेतकऱ्याला तसेच इतर ग्रामीण कारागीर बांधकाम तसेच इतर असंघटित क्षेत्रातीळ जनता आधीच कोरोना आणि आता ओल्या दुष्काळामुळे मोट्या आर्थिक संकटात आहे त्यांना आधार दिला पाहिजे यासाठी वेळोवेळी निवेदने दिली आहेत पण सरकार काहीही निर्णय घेत नाही जिल्हा प्रशासनही संवेदनशील नाही त्यामुळे आमी पायी मोर्चा काढत आहोत असे यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष गोवीड आर्द्ड यांनी सांगितले.
यावेळी गोविंद आर्दड ,सर्जेराव बरसाले,संतोष राठोड,अंशीराम गणगे, बाळराजे आर्दड,जनार्धन भोरे,दिगंबर मोरे,बालासाहेब राऊत,भागवत हरबक, शरद राऊत, मुबारक पठाण,विठ्ठल खवाटे,प्रकाश अधुडे,ज्ञानोबा लहाने,अजित पंडित,आदींची उपस्तीती होती.