Home विदर्भ नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

58
0

यवतमाळ / घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – येथून 12 किमी अंतरावर असलेल्या येळाबारा येथे चिल्लर पैशाच्या वादातून धकल गाडी चालक व त्यांच्या दोन मुलांनी आदिवासी युवक दिनेश पुंडलिक कासारे याला बेदम मारहाण करून हात मोडल्याचा प्रकार घडला. याबाबत दिनेश ने वडगांव जंगल पो. स्टे. तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारी वरून राजु दौलत पाईकराव, सुधाकर राजु पाईकराव आणि भास्कर राजु पाईकराव यांचे वर भा. द. वी.324,323,504,506 अन्वये गुन्हा नोंद केला असून अधिक तपास ठाणेदार नरेश रणभिर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संतोष धकार्गे करीत आहे. गैर अर्जदार हे नेहमीच गावात दादागिरी करीत असून यापूर्वीही त्यांनी बऱ्याच लोकासोबत वाद घालत दादागिरी चालविली आहे. तिघेही बाप लेक आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही या आविर्भावात वावरत असून तक्रार कर्त्याला या तिघा पासून जिवित्वाची भीती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले या बापलेका मुळे बहुतांशी जनता तंग आली असून वडगांव जंगल पोलिसांनी त्यांचे मुसक्या आवराव्यात अशी जोरदार मागणी होत असून आता पोलिस काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.