
धामनगाव रेल्वे – प्रशांत नाईक
अमरावती – जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष,समाजभुषन तहसिलदार भगवत पांडूरंग कांबळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणुन पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रिय चर्मकार महासंघ अमरावती जिल्हा कार्यकारणीच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री मा.श्री.बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रवक्ते रविंद्र राजुसकर,प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड,विदर्भ प्रमुख गजानन भटकर यांच्या मार्गदर्शनानुसार धामणगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष चर्मकार समाजातील,समाजभुषन तहसीलदार भगवत पांढुरंग कांबळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना बढती (पदोन्नती) मिळाल्याबद्दल त्यांचा धामणगाव रेल्वे येथील सर्किट हाऊस येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,उपाध्यक्ष सत्यनारायन सुर्योदय यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्छगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन धामणगाव बस स्थानक वाहतूक नियंत्रक एस.एस.पाचखंडे,सत्यनारायन सुर्योदय,शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तिवारी,तालुका अध्यक्ष मनोहर वाडेकर,तालुका सचिव विलास चंदन,सुरेश खोडे हे होते.तहसिलदार कांबळे यांनी प्रशासकीय सेवेत उल्लेखनिय आदर्श लोकहिताची कामे जलदगतीने चांगली कामे केली. त्यांना चांगल्या कामाबद्दल महसुल विभाग , महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट कामाबद्दल प्रशासनाने गौरव केला.कांबळे यांना उपजिल्हाधिकारी म्हणुन बढती मिळाल्याबद्दल जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भगवत कांबळे यांनी पुसद,वाशिम,उमरखेड,चांदुरबाजार येथे तहसिदार म्हणुन सेवा दिली.त्यांची पदोन्नती झाल्याबद्दल श्याम आकोडे , राजेंद्र तांबेकर,प्रा.गजानन वानरे , सुधाकरराव पानझाडे , जगदेवराव रेवसकर , विजयराव शेकोकार,गणेशराव बुंदिले,रमेश गव्हाळे,विजय बाभुळकर,योगेश पखाले,नरेंद्र काकडे,अविनाश तायडे , किशोर थोटे,देवानंद गणोरकर , राजेंद्र पटके,सुधिर तायडे , नंदु ढाकरे,महेश बोरकुटे , संतोष पाचपोर,आशिष गोडबोले,देवराज काळे,राहुल तायडे,सुमित सतारे,अजय लोखंडे सुनिल मालखेडे,रमेश सरोदे,राजीव चव्हाण,विलास हिरे,शरद ठोसरे,संदिप हिरे,अभय आकोडे,सतिश घोरे,गौरव आकोडे,नंदु चव्हाण, सुधिर डाखोडे , सचिन चापके,कपिल बोरकुटे अनिल जामठे,मुरलीधर व्यवहारे, गजानन चांदणे , विठ्ठल सावळे,अनंत पानझाडे,अनिल घोरे,सुरज बोरकुटे,सुरज लेवटे,गजानन वाडेकर,सौ.पद्माताई भागवत,सौ.शोभाताई लोखंडे,सौ.ज्योत्सनाताई चापके,सौ.वनमालाताई काकडे,श्रीमती नलिनीताई चापके,सौ.उषाताई तायडे,सौ.रत्नाताई मोहकर,सौ.राजकन्याताई मोहकर,शालीनीताई तायडे आदिनी शुभेच्छा देऊन स्वागत केले आहे.










































