Home महत्वाची बातमी साहेब मी जीवंत आहे हो ????

साहेब मी जीवंत आहे हो ????

890

चक्क जिवंत असलेल्या महिलेला केले मृत घोषित ,

रुग्णालय पोलीस प्रशासनाची मोठी चूक ,

विनोद पत्रे ,

यवतमाळ ,

विष प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या एका महिलेचा जिवंतपणीच मृत्यू अहवाल पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. पोलिसांनीही कोणतीच खातरजमा न करता, ‘मर्ग डायरी’त मृत्यूची नोंद केली. स्थानिक दैनिकात आपल्या मृत्यूची बातमी वाचून हादरलेली ही महिला थेट पोलीस ठाण्यात पोहचली. त्यानंतर कागदोपत्री मृत असलेली बाई समोर उभी ठाकलेली पाहून पोलिसही अवाक झाले. आपली घोडचूक झाल्याचे मान्य करीत पोलिसांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही या महिलेला कागदोपत्री पूर्ववत जिवंत केले. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी ही घटना घडली