Home महत्वाची बातमी एक वर्षा पासुन १७ लक्ष रुपायाचे सभामंडपाचे काम अपूर्णच !

एक वर्षा पासुन १७ लक्ष रुपायाचे सभामंडपाचे काम अपूर्णच !

138
0

काम

त्वरित पुर्ण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने नगर पंचायत समोर आंदोलन

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] आमदार डॉ संजयकुटे सर्व समाज बांधवांत समरस होऊन समाजातील घटकांचा सर्वागिंण विकास व्हावा म्हणुन विकास निधी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने व निधीची मांगणी रेटुन धरल्यामुळे तेव्हा कुठे विकास निधी उपलब्ध झाली निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन करुन वंचीत घटकांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या हे उदीष्ठ व हेतु त्याचाच एक भाग म्हणुन आमदार निधी मधुन माहे जानेवारी 2020 पासून संग्रामपूर येथील वार्ड क्र 8 व वार्ड क्र 13 मध्ये सभामंडपाच्या कामाला सुरुवात झाली खरी या दोन वार्डापैकी वार्ड क्र. 13 चे काम पूर्ण झाले मात्र जवळ पास १ वर्ष पुर्ण होत असतांना वार्ड क्र. 8 चे सभामंडप काम अपुर्ण का ? असा प्रश्न मुसलीम समाज बांधवां कडून उपस्थीत होत संबंधीत ठेकेदार विरुद्ध तिव्र नाराजीचा सुर निघत आहे गेल्या १० महिणे पासुन १७ लक्ष रुपये निधी मंजुर असलेले सभामंडप अपुर्ण अवस्थेत का ? कोणाच्या म्हण्या वरुन जळगाव येथील संबंधीत कंत्राटदार यांने काम बंद केले अपुर्ण सभामंडपाचे काम मार्गी लावण्याची मांगणी कंत्राटदार वानखडे व नगर पंचायत कडे वेळो वेळी करुन उडवा उडवीचे उतर ठेकेदार , नगर पंचायत कडून मिळत असल्याचा आरोप मुसलीम समाज बांधवांनी केला आहे वार्ड नं ८ मध्ये अपुर्ण अवस्थेत असलेल्या मांगे राजकारण आडवे येत असल्याचे बोलले जात आहे खुशाल राजकारण करा विकास करण्यासाठी मात्र बंद पडण्यासाठी नव्हे असा प्रश्न सुज्ञ नागरिकां कडून उपस्थीत होने साहजिक आहे वेळो वेळी जळगाव जा येथील ठेकेदार वानखडे यांना दुरध्वनी व्दारे प्रत्येक्ष भेटुन सभामंडपाचे गेल्या १० महिणे पासुन अपुर्ण काम पुर्ण करण्याची मांगणी करूनही परिणाम शुन्य आहे संबंधीत ठेकेदार नगर पंचायतचे अधिकारी यांच्या सह सामाजीक कार्यकर्ते यांचे फोन घेत नाही अपुर्ण अवस्थेत असलेले सभामंडप त्यामुळे मुसलीम समाजात तिव्र असंतोष असुन मुसलीम समाज बांधवांनी 11 ऑक्टोंबर पर्यत सभामंडप कामाला सुरुवात करण्याचे अलटिमेट दिले अन्यथा 12ऑक्टोंबर पासुन लोकशाही मार्गाने नगरपंचायत संग्रामपूर समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर पंचायत कार्यालय अधिक्षक शरद कोल्हे , नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनातुन अब्दुल हमीद शेख, शेख हनिफ, शेख कलीम, रउप शहा, मौलाना इरफान, आसिफ खान, शेख चांद, अन्सार खान, शेख अनिस, शेख असलम यांनी दिला आहे.