Home जळगाव जळगाव जिल्हा किसान काँग्रेसची आढावा बैठक संपन्न… अमळनेर किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी...

जळगाव जिल्हा किसान काँग्रेसची आढावा बैठक संपन्न… अमळनेर किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी प्रा. सुभाष पाटील यांची निवड…

135

रजनीकांत पाटील

अमळनेर –  येथे मराठा मंगल कार्यालयात दि ६ ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता जळगाव जिल्हा किसान काँग्रेस बैठकीचा कार्यक्रम पार पडला.
सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे, सरचिटणीस युवराज पाटील, उपाध्यक्ष सखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम बळीराजाच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील निर्भया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीत “संघटक” म्हणून निवड झाल्याबद्दल पराग पष्टे यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. तर अमळनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेश पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा किसान काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृषिभूषण सुरेश पाटील यांनी केले. किसान काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून अमळनेर किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील (जिभाऊ ) यांनी केंद्र सरकारची शेतकरी विधेयके, त्याचे दुष्परिणाम, शेती विमा, ओला दुष्काळ अशा मुद्द्यांवर आपले मनोगत व्यक्त केले. चाळीसगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्राध्यापक एम एम पाटील यांनी देखील शेतकऱ्यां संदर्भात प्रभावी मुद्दे मांडले. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री शांताराम बापू यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री पराग पष्टे यांना कृषीभूषण सुरेश पाटील, बी.के. सूर्यवंशी, मनोज पाटील, प्रा.सुभाष जीभाऊ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी संबंधीचे निवेदन दिले. सदर निवेदनात जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पूर्ण खरीप हंगाम वाया गेला, म्हणून जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करण्यात आली. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणासाठी आमदार अनिल पाटील कार्यरत आहेत, तरी त्यांना सहकार्य म्हणून निवेदनात पाडळसरे धरणासाठी निधीची मागणी केली गेली. “मुख्यमंत्री सोलर योजनेत” अमळनेर तालुक्याचा समावेश करावा. खेड्यातील शेत् रस्त्यांच्या समस्येसाठी शासनाची” पानंद शेती शिवार योजना” शासनाने स्वतःहून खेड्यात कार्यरत करावी. रोजगार हमी योजनेचा विस्तार होऊन, शेतकऱ्यांची शेतीची कामे शासनाच्या रोजगार हमी योजनेमार्फत व्हावीत .2018 -19 चे फळबाग पिकांचे अनुदान, पात्र शेतकऱ्यांना त्वरित मिळावे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कापूस ज्वारी मका ची शासकीय खरेदी सुरू करावी. केंद्र सरकारची शेतीविषयक तीनही विधेयके जाचक असल्याने ती मागे घेण्यात यावी. शेतीसाठी पुरेसा विद्युत पुरवठा रात्री ऐवजी दिवसा व्हावा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५०,००० प्रोत्साहन अनुदान त्वरित अदा करावे .अश्या शेती, शेतकरीविषयीच्या विविध मुद्द्यांची मागणी केली गेली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष सखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजबराव बापू यांनी जळगाव जिल्हा काँग्रेसच्या आगामी कामाविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष पराग जी पष्टे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या शासनाच्या नावीन्यपूर्ण मुद्द्यावर प्रकाश झोत टाकत असताना, निवेदनातील मुद्दे कशा प्रकारे हस्तगत करता येतील, यावर भाष्य केले.
सदर कार्यक्रमास डॉक्टर अनिल शिंदे, संदीप घोरपडे, धनगर अण्णा पाटील, अशोक पाटील, बाळा अण्णा, आबाजी, भागवत गुरुजी, राजू फाफोरे, प्रा. शाम पवार, पद्माकर अण्णा, हरी भिका वाणी, प्रवीण जैन, प्रमोद पाटील आदी मान्यवर हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश पाटील, मनोज पाटील, भागवत सूर्यवंशी, प्रा. सुभाष जिभाऊ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके सूर्यवंशी यांनी केले व आभार मुन्ना भाऊ शर्मा यांनी मानले.