Home जळगाव नूरुद्दीन मुल्लाजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

नूरुद्दीन मुल्लाजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

195

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्ह्यातील कासोदा ता ,एरंडोल येथील विचार मंच चे जळगाव जिल्हा संघटक त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र चे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा भारतीय पत्रकार महासंघाचा चे एरंडोल तालुकाध्यक्ष समाजभूषण नूरुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले

जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने अमन रोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर शरीफ शेख यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमित दादा माळी (महाराष्ट्र पोलीस जळगाव संस्थापक कृती फाउंडेशन ) हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन डॉक्टर नरेंद्र ठाकूर एरंडोल ,भानुदास जोशी, सौ निशा पवार ,सौ भारती काळे, सौ भारती महस्के आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सेवक सेवाभावी संस्था चे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिनाल जैन यांनी तर आभार प्रदर्शन सौ सोनल कपोते यांनी केले.