
*उपाययोजना करा नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आला आहे*
*कुंभकर्ण झोपेत असलेल्या सचिवास निवेदन देऊन केले जागे..!*
प्रतिनिधी:-रवि जाधव
देऊळगाव मही :- मागील काही दिवसांपासून देऊळगाव मही नगरीत कोरोनाच्या प्रधुरभाव वाढतच चालला आहे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने ग्रामपंचायत सचिव रिंढे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की देऊळगाव महिमध्ये कोराना झपाट्याने वाढत आहे यासाठी ग्रामपंचायत ने गावात काही उपयोजना करावी, सॅनिटायजर फवारणी करावी व तसेच शक्य होईल त्या उपयोजना कराव्या जेणेकरून कोराना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. याच बरोबर देऊळगाव मही येथे गेल्या काही दिवसा पासून नियमित पाणीपुरवठा होत नाही याकडे लक्ष देऊन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा याबाबत ही निवेदनात मागणी केली आहे.तसेच देऊळगाव मही डीग्रस चौक येथील हायमस्ट लाईट वीज पुरवठा अभावी बंद पडून आहे त्यामुळे सदर ठिकाणी विजजोडणी करून हायमस्ट लाईट लवकरात लवकर सुरू करण्यात यावे सदर प्रश्न मार्गी लागले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी, दिपक शिंगणे (राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष दे.मही)
गजु शिंगणे , रंगा शिंगणे ,संपादक आदिल पठाण, राम शिंगणे, सचिन नागरे,सतीश म्हस्के , शेख रईस , शेख सोहिल, समाधान पवार , कैलास शिंगणे , प्रमोद शिंगणे , देवा शिंगणे , आकाश इंगळे , मुन्ना सोनसळे , निलेश सरोदे , सचिन शिंगणे , सचिन देशमुख , राहुल गायकवाड , स्वप्नील शेळके , उमेश शिंगणे , संदीप नागरे , दिपक शिगणे , विलास सरोदे , अतुल शिंगणे , ऋषिकेश वाघ , शिवा म्हस्के , सचिन पवार , विनोद शिंगणे , वैभव शेळके , रवी मुळे , यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.











































