Home मराठवाडा घनसावंगीचे तहसीलदार दिव्यांगांना न्याय मिळवून देणार काय ?? प्रहार संघटना उतरणार रस्त्यावर

घनसावंगीचे तहसीलदार दिव्यांगांना न्याय मिळवून देणार काय ?? प्रहार संघटना उतरणार रस्त्यावर

257

घनसावंगी – ( लक्ष्मण बिलोरे)

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील दिव्यांग घनसावंगीचे तहसीलदार यांच्याकडे न्याय मिळावा म्हणून आक्रोश करत आहेत.मुळातच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या दिव्यांगाना न्यायासाठी
शासन दरबारी, प्रशासनाकडे रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हि मोठी दुर्दैवाची बाब समजली जात आहे.प्रहार संघटना घनसावंगीच्या वतीने आज तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात यावे तसेच दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात याव्यात.कोरोना महामारिच्या काळात घनसावंगी तालुक्यातील दिव्यांगांचे खुप हाल झाले, उपासमार झाली.पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागायची वेळ आली.परंतु प्रहार संघटना हे सहन करणार नाही.लाॅकडाऊनच्या काळात ज्या दिव्यांगाना रेशनकार्ड नसल्याने शासनाचे कोणतेही अन्नधान्य मिळाले नाही त्याना त्वरित धान्य वितरण करण्यात आले पाहिजे.या मागण्यांची येत्या दहा दिवसांत दखल घेतली गेली नाही तर प्रहार संघटना आमरण उपोषणाला बसणार आहे.या निवेदनावर प्रहारचे तालुका अध्यक्ष अनिरुद्ध म्हस्के, शहरं अध्यक्ष विष्णू मीठे,प्रहार सैनिक सुनील खरात, जनाबाई जाधव,सायराबी गौस आदिंची नावे आहेत.