
रावेर (शरीफ शेख)
जळगाव – जिल्हाध्यक्ष महिला शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष जळगाव पाकिजा पटेल यांनी दिनांक 4 ऑगस्ट ला जळगाव येथे गफ्फार मलिक साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना भेटून माननीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी केली कारण दहा वर्षे पूर्ण झालेल्या महिला शिक्षकांना गावे कमी असल्यामुळे अवघड क्षेत्रात शाळेत जावे लागेल तसेच covid-19 असल्यामुळे बदल्या रद्द कराव्या त्या मागणीचा विचार करून त्यांनी तात्काळ परिपत्रक काढले जळगाव जिल्ह्याच्या प्रशासकीय बदल्या रद्द झाल्या . या परिपत्रकाचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांना लागू होणार आहे शिक्षकांच्या समस्या सोडविल्या बद्दल माननीय गफ्फार मलिक साहेब यांचे पाकिजा पटेल व उस्मान पटेल यांनी सत्कार केले.











































