मराठवाडा

जालना जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सावळा गोंधळ

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयाचा मोठा अभाव असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या काही कोरोना बाधीत रुग्णांचा नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे कोरोना रुग्णांच्या आकडेवारी वरून सावळा गोंधळ उडाला आहे.त्याचे झाले असे की,दि.30 जुलै रोजी अंबड तालुक्यातील महाकाळा येथील काही संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन सदर नमुने जालना प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल दि.3 1 जुलै रोजी प्राप्त होऊन त्यात 33 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात महाकाळा येथील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यापैकी 9 कोरोना बाधीत रूग्णांची नावे पुन्हा काल दि.7 ऑगस्ट रोजी जालना प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या नवीन 84 कोरोना बाधीत रुग्णांच्या यादीत समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांचा अहवाल दुसऱ्यांदा कोरोना बाधीत आला अशी सारवासारव आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाकडून केली जात असली तरी नवीन कोरोना बाधीत रुग्णांच्या यादीत संबधित रुग्णांचा समावेश करण्यात आल्याने एकूण कोरोना बाधीत रुग्णांच्या आकडेवारी संदर्भात मात्र आरोग्य यंत्रणा,जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि प्रसार माध्यमांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. दुसऱ्यांदा कोरोना बाधीत अहवाल प्राप्त झालेल्या रूग्णांची नावे नवीन कोरोना बाधितांच्या यादीत समाविष्ट करण्याचे प्रकार यापूर्वी देखील घडल्याचे अनेक उदाहरण आहेत.दोन दिवसांपूर्वी तर जिल्हा प्रशासनाने मृत रुग्णांच्या आकडेवारी संदर्भात चुकीचा कळस गाठल्याचे स्पष्ट झाले होते. मागील जुलै महिन्यातील 26 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत एकूण 8 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असतांना या रुग्णांच्या मृत्यूची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे काढण्यात येणाऱ्या त्या त्या तारखेच्या प्रेसनोट मध्ये किंवा दुसऱ्या दिवशीच्या प्रेसनोट मध्ये देणे अपेक्षित होते.मात्र कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू हा वेगवेगळ्या तारखेस झालेला असतांना दोन दिवसांपूर्वी च्या जिल्हा प्रशासनाच्या प्रेसनोट मध्ये आठही मृत्यू ची माहिती एकत्रितपणे देण्यात आल्यामुळे या आकडेवारी संदर्भात देखील चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता. अर्थात या चुकीचे खापर खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांच्या डोक्यावर फोडून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले हात झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला असून या गलथान व बेजबाबदार कारभारा संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री श्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनातील संबधित अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश द्यावेत अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...