मराठवाडा

वाह रे सून बाई ?????

Advertisements
Advertisements

अमीन शाह ,

औरंगाबाद ,

औरंगाबादमध्ये 90 वर्षीय वृद्ध सासूला जंगलातील नाल्यांमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सुनेनेच हा प्रताप केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस स्थानकामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असून संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कच्ची घाटी व पिरवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये 3 ऑगस्ट रोजी चिकलठाणा पोलिसांना 90 वर्षीय वृद्ध महिला जंगलातील नाल्यांमध्ये पडलेली आढळली. यावेळी पोलिसांनी त्या वृद्ध महिलेला नाल्यातून बाहेर काढत तिला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यांनतर तिच्या कुटुंबियांचा तपास करण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान असे निदर्शनास आले की ही वृद्ध महिला ही मुकी आणि बहिरी असल्याचे समोर आले आहे. भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती. परंतु लॉकडाऊन मध्ये या वृद्ध महिलेला उपासमारीचे दिवस सहन करावे लागत होते. अशातच या वृद्ध महिलेच्या मावस सुनेने या वृद्ध सासूला जंगलामध्ये फेकून दिले होते. औरंगाबाद येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस हा प्रकार आला आहे. औरंगाबाद येथील चिकलठाणा पोलिस स्थानकामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असून संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्या मूळे लोक हळहळ वयकत करीत आहे

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...