Home बुलडाणा आठवडी बाजार च्या दिवशी करोना रुग्ण असतांनाही सर्व काही बिनधास्त सुरू,

आठवडी बाजार च्या दिवशी करोना रुग्ण असतांनाही सर्व काही बिनधास्त सुरू,

216

साखरखेर्डा , सेंदुर्जन येथे आज भरले आठवडी बाजार ,

जिहाधिकारी मॅडम यांच्या आदेशाला खो ,

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे पाच करोना चे रुग्ण सापडले आहेत तर जवळच असलेल्या सेंदुर्जन येथे ही 2 रुग्ण आहेत करोना चे रुग्ण असतांनाही या गावात आज आठवडी बाजार व सर्व दुकाने बिनधास्त सुरू असल्याचे दिसत असून लोक ही बिना मास्क खरेदी करताना दिसत आहे , जिल्हा शांतता समिती च्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे यांनी आठवडी बाजार ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्या गावात बंद ठेवण्याचे सांगितले होते व जिल्हाधिकारी मॅडम सुमन चंद्रा जी यांनी ही तशे आदेश काढले होते मात्र काल ही मलकापूर पांगरा या गावात बाजार भरला होता व आज ही सेंदुर्जन , साखरखेर्डा या गावी बाजारात गर्दी सुरू असल्याचे दिसत असून लोक व दुकानदार बिना मास्क वयवसाय करत असल्याचे दिसत आहे , अश्याने कशी करोना ची साखळी तुटणार साहेब असा प्रश्न काही लोक करीत आहे ,

परिसर सील नाही ,

साखर खेर्डा बस स्टॅन्ड वर काल पासून दोन करोना चे पॉझेटिव्ह रुग्ण सापडले असून अद्याप पर्यंत ही तो परिसर सील करण्यात आला नाही त्या परिसरातील दुकानात गर्दी सुरू असल्याचे दिसत आहे ,

आदेशाचे पालन होणार का ???

मा , जिल्हाधिकारी मॅडम सुमन चंद्राजी यांनी आठवडी बाजारच्या दिवशी कडकडीत बंद चे आदेश काढले असतांनाही सिंदखेडराजा तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे लोकांच्या होणाऱ्या गर्दी मूळे वरील गावात करोना रोग अधिक प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ,