Home महत्वाची बातमी बेटा…सानिका मी तुझ्या घरी येऊन तुझे अभिनंदन करेन – नाना पटोले (...

बेटा…सानिका मी तुझ्या घरी येऊन तुझे अभिनंदन करेन – नाना पटोले ( विधानसभा अध्यक्ष )

205

देवानंद जाधव – मंगरूळ

यवतमाळ – बापाची ” तिरडी ” अंगनात, ” लेक गेली परिक्षा केंद्रात!या मथळ्याखाली काल आमच्या पोर्टल वरुन वृत्त प्रकाशित झाले. यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील कु.सानिका सुधाकर पवार हिने तब्बल ९८टक्के गुण मिळविले.

सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येऊन सुधाकर पवार या तिच्या वडिलांनी विहीरीत ऊडी घेत स्वतःची जीवन रेखा पुसुन टाकली होती. नेमके त्याच दिवशी अंगणात बापाची तिरडी बांधत असतांना तिचा संस्कृत विषयाचा पेपर होता. आभाळभर दुःखाचं गाठोडं काळजावर झेलत, स्वतःला सानिकाने सावरले. अन् मायच्या साडीच्या पदराने डबडबले डोळे पुसले, दुःखाचा आवंढा गिळत परिक्षा केंद्राची वाट धरली. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला, तिला संस्कृत विषयात तब्बल १००पैकी १०० गुण मिळाले. स्वत:ची बोली भाषा भिन्न असतांना सुध्दा , चिंतन, वाचन , मनन अगदी चिकाटीने केल्यानेच ती या यशाच्या शिखरावर पोहचली. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. हा विचारवंतांचा विचार सानिकाने आपल्या मानवी मनावर गोंदुन घेतला आहे. कपाळावर लिहीलेलं नशिब टाचेवरच्या भेगांशिवाय पुर्ण होत नाही ही मायबापांनी दिलेली शिकवन ति प्रत्यक्ष आचरणात आणुन ,दिवसरात्र पुस्तकात डोळे खुपसून अभ्यास करते आहे. दारिद्र्य, वाढती महागाई, निराधारता, भुक, न परवडणारे आजार, आदी नानाविध व्याधींनी परिवार उद्ध्वस्त झाला असतांना सुध्दा सानिकाने दहावीच्या परिक्षेत मारलेली बाजी कौतुकास्पद आहे. याचीच गांभीर्याने दखल घेत, महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी थेट विधानभवनातुन दूरध्वनी द्वारे संपर्क करुन सानिकाचे अभिनंदन करुन कौतुकाची थाप मारली. पञकार देवानंद जाधव यांचे ९८ ८१ १३९ १२६ या भ्रमनध्वनी क्रमांकावर विधानभवनातुन दूरध्वनी आला. सानिका ची मा.अध्यक्ष महोदयांनी मायेच्या ममतेने विचारपूस केली. या उपस्थित परिवार आणि तमाम हिवरी ग्रामस्थ पुरते भाराऊन गेले. जेव्हा केव्हा यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्यावर येईल तेव्हा सानिका बेटा तुझ्या घरी हिवरीला येऊन तुझे प्रत्यक्ष अभिनंदन करुन, पाठीवर कौतुकाची थाप मारेन. शिवाय तुझ्या पुढील शिक्षणासाठी योग्य ती तजविज करुन देईन,असा आशावाद व्यक्त केला. त्यावेळी सानिका आणी तिच्या आईचे डोळे भरून आले. साहेबांचा विधानभवनातुन फोन येणे आमच्या साठी राष्ट्रीय पुरस्कारासारखे आहे, अशी भावविभोर भावना सानिकाची आई नेञा यांनी व्यक्त केली, मि काबाडकष्ट करीन, हातावर आनुण पानावर खाईल, पण लाडाच्या लेकीला डाॅक्टर करीन, तेव्हाच माझ्या घरधन्याला खरी श्रद्धांजली दिल्या सारखी होईल, असा दुर्दम्य विश्वास सानिकाच्या आईने व्यक्त केला, विधानसभा अध्यक्ष मा.नाना भाऊ पटोले साहेब यांचे सोबत माझ्या सानिका चा संवाद घडवुन,दुग्ध शर्करा योग आनणार्या लढवय्ये शेतकरी नेते देवानंद पवार यांचे खास करुन सानिकाच्या परिवाराने आभार मानले.