
देऊळगाव मही : ( रवि जाधव) कोरोना हा शब्दच आता सर्वाना नकोसा झाला आहे, त्यामध्ये कोरोनाबाधीत म्हटले तर नकोरे बाबा मग तो जिवंत असो व मृत असाच प्रकार दि,२१ जुलै रोजी शहरात घडला, कोरोनामुळे अहिंसा मार्गावरील एका ७८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्या व्यक्तीच्या पार्थिवावर कोणीही अंत्यसंस्कार करण्यास तयार होत नव्हते, अशा परिस्थितीत येथील अरोग्य अधिक्षक डॉ,आस्मा शाहिन, मुख्याधिकारी निवेदीता घार्गे यांनी कोरोना बाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले, या कर्तृत्वामुळे धैर्यामुळे त्यांची सर्व स्तारातून कौतुक होत आहे, त्यांच्या या कार्याची दखल थेट जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व राज्य सरकार ने घेतली आहे ,
शहरातील अहिंसा मार्गावरील राहणाऱ्या कोरोना बाधीत ज्येष्ठ व्यक्तींचा दि,२१ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला, कोरोनाने त्या व्यक्तींच्या कुटूंबीयांनी सोडले नाही कुटूंबातील व्यक्ती बाधीत असल्यामुळे येथील कोविड सेंटरवर उपचार घेत होत्या, त्यामुळे बाधीत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुख्यधिकारी यांनी नगर पालिका कर्मचाºयां सोबत स्वर्गरथ पाठवून मृतदेह वैकुंठधाम स्मशानभूमित अंत्यविधीसाठी नेण्यात आला, कुंटुंबीय कोरोनाबाधीत असल्यामुळे उपचारार्थ दाखल होते, त्यामुळे ते येऊ शकले नाही, नगर पालिकेचे कर्मचारी सुद्धा कोरोनाची धास्ती व भिती असल्यामुळे अंत्यसंस्कार करायला आले नाही, त्यांच्या परिवारा कडून दोन लहान नातु उपस्थित होते, त्याचप्रमाणे अंत्यसंस्काराला आणण्यात ालेला मृतदेह हा कोरोना बाधित रुग्णाचा असल्यामुळे स्थानिकांनी सुद्धा विरोध केला होता, अशा सर्व विरोधाभासी परिस्थितीत या दोन्ही महिला अधिकारी पुढे आल्या, आपल्या जिवाची पर्वा न करता कुठलेही भय न बाळगता या महिला अधिकाऱ्यांनी पिपिई किट घालून स्वत: मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, त्यांच्या या धाडसाची चर्चा सर्व जिल्ह्यात होत आहे, या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करणार आहे,
या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुलेच्या लेकीचे दर्शन घडविले आहे, त्यांच्यावर चोहोबाजूुनी कौतूकाचा वर्षाव होत असतांना त्यांनी समाजाने कुठे तरी याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे दाखवून दिले आहे, मुख्याधिकारी निवेदीता घार्गे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अस्मा शाहीन या अधिकाºयांच्या कार्याला सलाम
-ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री











































