
( बातमी सोबत दिलेला फोटो काल्पनिक चित्र आहे )
भीतीवर आपटले व चार्जर च्या वायरने आवळला गळा , “आत्ताच दुपार ची घटना “
अमीन शाह
पुणे – आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त जीव लावणारी आपली आई असते. पण याच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मुलगी त्रास देत असल्याच्या रागातून जन्मदात्या आईनेच आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
ही घटना सांगवी परिसरातील असून या प्रकरणी आरोपी आईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. घटनेत रिया काकडे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या चार वर्षीय मुलीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. सांगवितील भालेकर नगरमध्ये दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.











































