
दूध दर प्रती लिटर 10 तर दूध पावडर प्रती किलो 50 रु अनुदान द्या.
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही/ :- २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जाहीर निवेदन देण्यात आले, देऊळगाव मही छत्रपती चौक येथे रेढ्याला दुधाने आंघोळ घालून स्वाभिमानाने आणोखे आंदोलन केले .दूध प्रती लिटर १० रु अनुदान व दुध पावडर ५० रु अनुदान देण्यात यावे या मागणी साठी रेढ्याला दुग्धभिषेक करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलतांना स्वाभिमानी नेते बबन चेके यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रु अनुदान व दुध पावडर प्रती किलो ५०रु अनुदान देण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात स्वाभिमानी राज्यभर आंदोलन उभारले.
यावेळी स्वाभिमानी नेते शेख जुल्फेकार,मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे,अंबादास बुरकुल,आत्माराम जाधक,वसंतराव पाटील, कुंडलिक शिंगणे,
यांच्या सह इतर स्वाभिमानी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











































