Home बुलडाणा चिखली ग्रामीण रुग्णालयात तीन व्हेंटिलीटरची व्यवस्था…

चिखली ग्रामीण रुग्णालयात तीन व्हेंटिलीटरची व्यवस्था…

34
0

रयत क्रांती संघटनेकडुन करण्यात आली होती मागणी…

चिखली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जग हादरलेले असून सर्वत्र महामारी चे सत्र सुरूच असून लोकसंख्येप्रमाणे रुग्णालये व डॉक्टर सह साहित्य ही अपुरे पडत आहेत, तालुका भरात लाखोच्या लोकसंख्येवर फक्त एकच ग्रामीण रुग्णालय असून त्याठिकाणीही अत्यावश्यक सुविधा नसल्याने अतिदक्ष रुग्णांना व्हेंटिलेटर अभावी इतरत्र रेफर करावे लागत आहे चिखली ग्रामीण रुग्णालय येथे अतिदक्ष रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आवश्यक असल्याने माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संकल्पनेतून Known You Seed (India) pvt ltd कँम्पनी अंतर्गत Known you farmer Wlefare Foundation च्या वतीने चिखली ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक 21 जुलै रोजी चिखली विधानसभा मतदार संघाच्या प्रथम नागरिक आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते रुग्णालयाला तीन व्हेंटिलेटर सह अत्यावश्यक असलेले इन्फ्रारेड थरमोमीटर सॅनिटायझर, हॅण्ड वॉश, बेड ,मास्क,डिस्पेन्सर मशीन,चार बेड,पल्स ,ऑक्सिमीटर, पी.पी.ई किट, महत्त्वपूर्ण साहित्य देण्यात आले आहे, यापुढे रुग्णांना अत्यावश्यक सेवा चिखली ग्रामीण रुग्णालय येथेच मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे व या कोरोणा विषाणू महामारी च्या काळात रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी एक आशेची नवीन किरण या ठिकाणी निर्माण झालेली आहे या अगोदर चिखली ग्रामीण रुग्णालय येथे अत्यावश्यक सेवेचा अभाव असल्याने त्या साठी रयत क्रांती संघटनेकडून रुग्णांचे हाल पाहता वेळोवेळी महत्त्वपूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्याची व तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा ही करण्यात आला होता.
चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले पाटील व रयत क्रांती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील आणि कंपनीचे प्रॉडक्शन इन्चार्ज विकास सूरवसे यांच्या प्रयत्नातून चिखली ग्रामीण रुग्णालयाला महत्त्वपूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे,या प्रसंगी चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले पाटील,रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित, आरोग्य अधीक्षक खान मॅडम, पंडितराव देशमुख, कुणाल बोंद्रे,शेख अनिस शेख बुढन, विनायक सरनाईक, सुभाष राजपूत, कृष्णकुमार सपकाळ, गोपाल डेव्हडे, गोविंद डेव्हडे, नामु गुरुदासानी, अनमोल ढोरे पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील, उद्धव पाटील ,कैलास गाडेकर , डॉ,राजपूत,डॉ जाधव,डॉ गायकवाड, डॉ पांनगोळे मॅडम,डॉ प्रशांत मेहत्रे ,डॉ गवई , अनंतराव वानखेडे,सनजय मिसाळ, बबन केंधळे,अनिल वाकोडे, छोटू कांबळे, बद्री पांनगोळे,भारत जोगदंडे, मनोज जाधव,गणेश डोके, जितेंद्र पाटील,अमोल जाधव,अमोल पबले,प्रभाकर जाधव यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थिती उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting