Home मुंबई ऐतिहासिक बौद्ध लेणी जतन करावी अन्यथा सिडकोला टाळ ठोकू

ऐतिहासिक बौद्ध लेणी जतन करावी अन्यथा सिडकोला टाळ ठोकू

161

पँथर ऑफ सम्यक योद्धा चा इशारा

नवी मुंबई , (प्रतिनिधी) येथील प्राचीन व ऐतिहासिक वाघवली लेणीचे संवर्धन करणे आववश्यक असून सिडको च्या मुजोर अधिकाऱ्यांनी लॉकडावून च्या काळात ही लेणी उध्वस्त केली आहे, या लेणीचे जतंन व पुनर्वसन करण्यात नाही आले तर सिडकोला टाळ ठोकू व पुढील काळात पँथर स्टाईल आंदोलन चालूच राहील असा इशारा पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेच्या वतीने पुज्य भदंत विशुधनानंद महाथेरो यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.

नवी मुंबई प्रायोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हद्दीतील प्राचीन अशी वाघवली बौद्ध लेणी जिथे अलीकडच्या काही काळात गावकऱ्यांनी केरुमाता देवी बसवून पूजा अर्चना करत होते,
ही लेणी 1500 वर्षपूर्वीची ऐतिहासिक वास्तू असून सदर लेणीचे संवर्धन व पुनर्वसन करून ऐतिहासिक वारसा जपणे आवश्यक आहे, कारण ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे,
लेणीबद्दल काही दलालप्रवृत्तीचे व स्वतःला लेणी अभ्यासक म्हणवून घेणारे, बौद्ध लेणी नाही, हिंदू लेणी आहे असा खोडसाळ प्रचार करत आहेत त्यामुळे समाजात दुही निर्माण होऊन आंदोलनाचा प्रभाव कमी करण्याचा कट रचत आहेत, मात्र- ही लेणी ऐतिहासिक वारसा असल्याने हिंदू जैन किंवा बौद्ध लेणी असा भेदभाव न करता भारताची धरोहर आहे असे समजून लेणी वाचवणे आवश्यक वाटत असल्याचे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पुज्य भदंत शिलबोधि यांनी व्यक्त केले.
लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान असून जिथे बुद्धत्वाचा वास असतो लेणी ही बोध धर्मियांची अस्मिता ठरते बौद्धगुरूंचा निवारा आश्रयस्थान ठरते आणि जातीय भावनेतून बौद्ध भिक्षूंचे निवासस्थान जर उध्वंस करून बेघर करण्याचा कुटील डाव असेल तर भारतातील तमाम बौद्धभीक्षूनच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
लेणी मध्ये गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केलेल्या केरूमाता देवीचे पुनर्वसन केले मात्र: भिक्षूंचे निवासस्थान उध्वस्त करून भिक्षूंना भेघर केले आहे. बौद्ध लेणीच्या जागी उत्खनन करून लेणीचे अवशेष जतन करावे व लेणीचे पुनर्वसन करावे, व लॉकडाऊन च्या काळात लेनिवर नंबरप्लेट नसलेले बुलडोजर चालविणाऱ्या अधिकारी गुत्तेदार व संबंधितांवर गुन्हे नोंदवावेत अन्यथा देशातील तमाम भिक्खू व बौद्ध अनुयायी पँथर स्टाईल आंदोलन करतील याला जबाबदार प्रशासन असल्याचा गंभीर इशारा राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकनिकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
लेणी बचाव आंदोलनOBC नेते मा राजाराम पाटील मागील 4 वर्षांपासून करत असून यापुढे ज्यांना ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी 9004363903 या क्रमांकावर व्हाट्सअप्प मेसेज करावा असेही सांगण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकावर भदंत नागसेन थेरो,भदंत शांतिरत्न थेरो, भदंत बोधीशील थेरो, भदंत आर.आनंद, भदंत संबोधी,भदंत संघप्रिय,भदंत पद्मपाणी,भन्ते डॉ.चंद्रबोधी, भन्ते धम्मबोधी,भन्ते उपाली, व संघटनेचे कार्याध्यक्ष श्रावण गायकवाड, उपाध्यक्ष वीरेंद्र लगाडे, संघटक राजेश पिल्ले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची नावे आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, दि बुद्धाज बोधी ट्री, सम्यक मैत्रेय फौंडेशन, जयभीम नगर बुद्धीविहार व अन्य धार्मिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचेही पत्रकात नमुदिले आहे.