Home विदर्भ देवळी तालुक्यातील 12 महिला बचत गटांना मिळाली कृषि अवजार बँक स्थापन करण्यास...

देवळी तालुक्यातील 12 महिला बचत गटांना मिळाली कृषि अवजार बँक स्थापन करण्यास पूर्व संमती.!

116

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि.21 :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत शेतकरी,उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघ व नोंदणीकृत शेतकरी व महिला बचत गट,तसेच भूमिहिन व्यक्तीसाठी विविध शेतीपयोगी व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. देवळी तालुक्यातील भिडी येथील 12 महिला बचत गटांना कृषि अवजार बँक स्थापन करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांचे हस्ते पूर्व संमतीपत्र प्रदान करण्यात आले.
या योजनेअंतर्गत कृषि उत्पादनाचे संकलन केंद्र, कृषि उतपादनाचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, गोदाम छोटे वेअर हाउस, फळ पिकवणी केंद्र, कृषि मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी शितवाहन, वातानुकूलीत कृषि माल विक्री केंद्र, व्हेंडिंग कार्ट, कृषि माल प्रक्रिया केंद्र , कृषि अवजारे सेवा केंद्राची स्थापना करणे व मुरघास बनविने इत्यादी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी , महिला , भूमिहीन इत्यादींचे बचत गट या योजनेस पात्र असणार आहे.
देवळी तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या महिला बचत गटामध्ये सहारा स्वयंसहायता बचत गट, प्रेरणा स्वयंसहायता बचत गट, जय माता दि स्वयंसहायता बचत गट, सावित्रीबाई बचत गट, रेणुका माता स्वयंसहायता बचत गट, राजमाता स्वयंसहायता बचत गट, राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता बचत गट, सत्यसाई स्वयंसहायता बचत गट, अहिल्याबाई होळकर स्वयंसहायता बचत गट, भवानी माता बचत गट, अवतार मेहेर बाबा स्वयंसहायता बचत गट व समृध्दी स्वयंसहायता बचत गटांना उपविभागीय कृषि अधिकारी यांनी पूर्व संमती दिली आहे.