Home विदर्भ कोरोणा व किटकजन्य जलजन्य आजार जनजागृती रँली.!

कोरोणा व किटकजन्य जलजन्य आजार जनजागृती रँली.!

126

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

रत्नापूरात आरोग्य विभागाचा उपक्रम.

वर्धा – प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर च्यावतिने मंगळवारी (ता.१४ ) रोजी रत्नापूर येथे कोरोणा डेंग्यू जणजागरण करण्यात आले .
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. मिनल पांचगे उपस्थित होते. यावेळी आरोग्य सहाय्यीका सविता फरताडे आरोग्य सेवक माधव कातकडे वृंदा घोडमारे भावना कांबळे माधुरी वाशिमकर व मुख्याध्यपक श्रीराम शहारे या कार्य क्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना दिलीप उटाणे यांनी सांगितले की कोरोणा प्रादुर्भाव व डेग्यू हिवताप सारखे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे व डेंग्यू सारख्या आजाराला आळा घालने ही ग्रामस्थांची जबाबदारी असून डेग्यू सदृश्य आजाराला रोखण्यासाठी दिलेल्या उपाययोजना अमंलात आणून आरोग्य विभागाला सहकार्य करून गावपातळीवर आळा घालण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोणाचा धोका संपला नसून सतर्क राहण्याची गरज आहे.
कोरोणा सोबतच डेंग्यू हिवताप , किटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याची गरज आहे.
यावेळी डाॅ.पांचगे यांनी मार्ग दर्शन करतांना सागितले की, जुलै महिना डेग्यू प्रतिरोध म्हणून विविध कार्यक्रमा मार्फत जनजागरण जिल्हाधिकारी विवेक भिमनवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले जिल्हा हिवताप अधिकारी जयश्री थोटे ( मानकर) यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे .वेळी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.