Home बुलडाणा चला मेहकर तालुका कोरोना मुक्त करूया! मेहकर शहरातून पोलिसांचे पंथ संचलन ,

चला मेहकर तालुका कोरोना मुक्त करूया! मेहकर शहरातून पोलिसांचे पंथ संचलन ,

141

,सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या

दुकानदार,फेस मास्क न वापरणाऱ्या लोकांवर करण्यात आली कार्यवाही.

जमीर शाह

डोणगांव

मेहकर तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांन मुळेच कोरोनाचा शिरकाव झाला यापूर्वी जिल्हा भरात कोरोना बाधित रुग्ण सापडत असतांना मात्र मेहकर तालुका मात्र कोरोना मुक्त होता त्या मुळे पुन्हा मेहकर तालुका कोरोना मुक्त करण्या साठी प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले व १ जुलै रोजी मेहकर शहरातून रुटमार्च काढण्यात आले.
बुलढाणा जिल्हातील शेवटच्या टोकावर असणारा मेहकर तालुका या मधील मेहकर या शहरात अद्याप परियानंत कोरोनाने शिरकाव केलेला नाही जो कोरोना बाधित रुग्ण सापडला होता तो तेथील एका हॉटेल मध्ये विलगिकरणा साठी ठेवलेला होता अश्यात कोरोना मुक्त मेहकर कोरोना मुक्त राहायला हवा यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करून कोरोनाला हरवायचे या साठी उपविभागीय महसूल अधिकारी गणेश राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी,नगर पालिका मुख्य अधिकारी सचिन गाढे,तहसीलदार संजय गरकल,ठाणेदार आत्माराम प्रधान,नगर पालिका कर्मचारी,पोलीस कर्मचारी मेहकर यांनी रूट मार्च काढला या दरम्यान जे दुकानदार दुकानावर गर्दी होऊदेत आहेत ज्याने सोशल डिस्टन्सचा पाळल्या जात नाही अश्या एका दुकांनदारास १५०० रुपये दंड ठोठावण्यात आला,तर मास्क न वापरणाऱ्या २३ लोकांना ११ हजार ७०० रुपये दंड ठोठावण्यात आला ज्याने नियमित मास्क वापरा,गर्दी करूनये,सोशल डिस्टन्सचे पालन करावे असा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला.