Home नांदेड नांदेड” कोरोनातून आज रोजी ६ रूग्ण झाले बरे झाले तर नवीन ७...

नांदेड” कोरोनातून आज रोजी ६ रूग्ण झाले बरे झाले तर नवीन ७ व्यक्ती कोविड १९ ने बाधित झाले

105

राजेश एन भांगे

नांदेड – कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 3 बाधित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित आणि औरंगाबाद येथे संदर्भित झालेले 2 बाधित असे एकूण 6 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 298 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत.
गुरुवार 2 जुलै रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 79 अहवालापैकी 58 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. आज 7 नवीन बाधित आढळल्याने जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 398 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये निजाम कॉलनी येथील 60 वर्षाची 1 महिला, खुदबेनगर येथील 40 वर्षाची 1 महिला, जुना मोंढा येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, हैदरबाग येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, आंबेडकरनगर येथील 80 वर्षाचा 1 पुरुष तसेच मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील 30 वर्षाचा 1 पुरुष बाधित यांचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत 398 बाधितांपैकी 298 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 83 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 13 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 83 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 40 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 1 बाधित उपचार घेत आहे. तर 9 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. गुरुवार 2 जूलै रोजी 90 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 935,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 607,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 710,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 07,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 398,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 17,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 298,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 83,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 90 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.