July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

आषाढी एकादशी ला मुख्यमंत्र्या सोबत हे करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा , ?

अमीन शाह

यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरात गेली सहा वर्षे सेवा करणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. मंदिरातील सहा विणेकऱ्यांच्या नावे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. यामध्ये बडे यांच्या नावाची चिठ्ठी उचलली गेली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ही माहिती दिली. आषाढी एकादशी १ जुलै रोजी आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी यात्रेवर अनेक निर्बंध आहेत. सरकारने मानाच्या ९ पालख्यांना पंढरीला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यंदाच्या विठ्ठल आणि रुक्मिनीमातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या महापूजेच्या वेळी दर्शन रांगेतील वारकरी दाम्पत्याला माण मिळतो. एकादशी दिवशी मध्यरात्री १ च्या सुमारास दर्शन बंद केले जाते. यावेळी रांगेतील दाम्पत्याला शासकीय माहापुजेचा मान मंदिर समिती देते.
यंदाच्या आषाढी वारीला भाविक नाहीत. त्यामुळे दर्शन रांग नाही. त्यामुळे यंदा मानाचा वारकरी कोण? असा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे चिठ्ठी टाकून याची निवड करण्यात यावी असे ठरले. त्यानुसार, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत मंदिरातील सहा विणेकऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहिली गेली. यातील एका चिठ्ठीतील विणेकरी यांना महापूजेचा मान मिळणार होता. त्याप्रमाणे विठ्ठल ज्ञानदेव बडे (सध्या रा. पंढरपूर, मूळगाव- चिंचपूर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांना महापुजेचा मान मिळाला.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!