July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

पत्रकार प्रताप मेटकरी यांना राज्यस्तरीय वसुंधरा आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर

अभिनेते विजय पाटकर, सैराटफेम तानाजी गुलगुंडे यांच्यासह १५ दिग्गजांची पुरस्कारासाठी निवड

वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने तृतीय वर्धापन निमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार २०२० जाहीर झाले असून मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विजय पाटकर यांना राज्यस्तरीय वसुंधरा कलारत्न पुरस्कार, सैराट चित्रपटफेम, तानाजी चांगदेव गुलगुंडे यांना राज्यस्तरीय वसुंधरा कलागौरव पुरस्कार तर दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप दत्तात्रय मेटकरी यांना राज्यस्तरीय वसुंधरा आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नानासाहेब मंडलिक आणि सचिव नितीन चंदनशिवे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची महत्त्वपूर्ण भुमिका घेऊन अल्पावधीत महाराष्ट्रात नावलौकिक करणाऱ्या वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने तृतीय वर्धापन निमित्ताने, वर्धापन वसुंधराचा – सोहळा कृतज्ञतेचा पर्व ३ रे राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार २०२० करिता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांची जाहीर निवड केली आहे. यामध्ये
मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विजय पाटकर (राज्यस्तरीय वसुंधरा कलारत्न पुरस्कार), सैराट चित्रपट फेम, तानाजी चांगदेव गुलगुंडे (राज्यस्तरीय वसुंधरा कलागौरव पुरस्कार), प्रताप मेटकरी (राज्यस्तरीय वसुंधरा आदर्श पत्रकारिता पुरस्कार), सांगली येथील डॉ. विक्रमसिंह कदम (आरोग्य सेवा पुरस्कार)
सुभाष सातपूते (पर्यावरणरत्न), रशिद टपाल (शिक्षकरत्न), वसंत साबळे (क्रिडारत्न)
संदीप सुर्यवंशी – (संगीतरत्न), सांगली येथील
डॉ. सारिका कुंभार (समाजरत्न), प्रताप गोरे (समाजसेवा) यांची राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कारासाठी जाहीर निवड करण्यात आली आहे.
वसुंधरा पुरस्कारामध्ये अमोल माळी यांची आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार, प्रदिप पाटील (पोलीसरत्न), पुजा शिंदे (आदर्श वसुंधरा स्त्री गौरव), गणेश धेंडे (आदर्श वसुंधरा प्राणीमित्र संस्था), शितलकुमार जाधव (आदर्श वसुंधरा वृक्षमित्र संस्था) यांची निवड राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार निवड समितीद्वारे करण्यात आली आहे.
देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम न घेता निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना पोष्टाद्वारे पुरस्कार, सन्मान पाठवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार नामांकन निवड प्रक्रियेत निवड समितीचे अध्यक्ष नानासाहेब मंडलिक, सदस्य प्रा.डॉ. बाळासाहेब कर्पे, भगवान जाधव व डॉ. वैशाली हजारे यांनी प्राप्त प्रस्तावातून वरील निवड यादीस अंतिम मंजूरी दिली आहे. वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, सचिव नितीन चंदनशिवे, कोमल हसबे, प्रा. संजय ठिगळे, विजय सगरे, रोहीत पवार, विजयकुमार ठिगळे, स्नेहा पवार व प्रतिक्षा जाधव यांनी पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!