Home विदर्भ कार दुचाकी अपघातात युवक जागीच ठार

कार दुचाकी अपघातात युवक जागीच ठार

164

वर्धा / तळेगांव ( शा. पंत ) – कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला हा अपघात तळेगाव नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील कुक्कुट पालन समोर दुपारी ४ वाजताचे दरम्यान झाला.

तळेगाव येथील मिलींद गायकवाड अंदाजे वय ३२ वर्ष हा युवक एम. एच. ४८ एम . ७५०७ क्रमांकाच्या दुचाकीने तळेगाव नागपुर रोडवरील कुक्कुट समोरील दुभाजकावरुन रस्ता अओलांडत असतांना नागपूर वरून अमरावती कडे जात असलेल्या एम. एच. २७ बी. झेड. ७१०८ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक मिलि्द गायकवाड रोडच्या कडेला फेकला जावुन जागीच ठार झाला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी कार ला चिपकुन तब्बल 100 मीटर पर्यंत घासत गेली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले व मृतकाला उत्तरीय तपासनी करीता ग्रामीण रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले अधिकचा तपास तळेगांव पोलीस करीत आहे.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख 9890777242 / 9834453404