Home मराठवाडा आ. पडळकर यांच्या गोपीचंड गडावरील उपस्थितीची उत्सुकता कायमच?

आ. पडळकर यांच्या गोपीचंड गडावरील उपस्थितीची उत्सुकता कायमच?

150

परभणी / गंगाखेड – गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारातील गोपीचंद गडावर उद्या गुरुवारी गोशाळा भूमिपूजन होत आहे. या कार्यक्रमास विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार की नाही याबद्दल समर्थकांत उत्सुकता दिसून येत असल्याचे चित्र आहे.
धनगर आरक्षण अंमलबजावणी लढतील परभणी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मान्यवरांसह नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत. गोपीचंद पडळकर हे आमदार झाल्याच्या आनंदात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोपीचंद गडावरील कार्यक्रमास गोपीचंद पडळकर हे स्वतः उपस्थित राहणार नाही याबद्दल कार्यकर्त्यां सह समर्थकांत उत्सुकता निर्माण झालेली आहे. कोरोना महामारी च्या काळात आ. पडळकर कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास यांना भेटण्यासाठी मराठवाड्यातील हजारो कार्यकर्ते गोपीचंद गडावर जमु शकतात.