विदर्भ

स्वस्त धान्यं दुकानदाराच्या मे महिन्यात दिलेल्या निवेदनाची पूर्तता न झाल्यास, 9 जुन पासुन स्वस्त धन्याचा कोटा उचल व वितरण न करण्याचा देवळीच्या स्वत धान्यं दुकानदार संघटनेचा ईशारा.

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – आजच्या स्थितित कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दोन महिन्यापासून देशात लॉकडाऊन केले आहे. अशा संकटाच्या परिस्थीतीत कुणीही गरिब उपाशी राहू नये.म्हणून स्वस्त धान्य दुकानदार आपले जीव संकटात घालुन 8 ते 10 तास धान्य वाटपाचे काम करित आहे.
परंतु शासनाने याची दखल घेतली नाही या कार्याबाबत स्वस्त धान्य दुकानदाराना कोविड़ -19 योद्धा म्हणून घोषित करा ; प्रत्येक राशन दुकानंदाराना 50 लाख रुपयांचा विमा काढा या मागणी करिता कोविड़ 19 संकट टळल्यावर संघटना संप करनार असल्याचे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील स्वस्त धान्यं दुकान संघटना च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असुन यासंदर्भात विविध मागण्या शासनाकडे निवेदनाव्दारे केल्या आहे.
या अगोदर मे महिन्यात शासनाला निवेदन दिलेत या निवेदनाची पुर्तता न केल्यामुळे संघटनेला 9 जुन पासुन धान्याचा कोटा उचल व वितरण न करण्याचा इशारा देवळीच्या तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसि न परवाना धारक संघटनेने दिला आहे. या देवळी तालुक्यातील संघटनेचे अध्यक्ष प्रमोद बिरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेन्द्र देशमुख यांची भेट घेवून निवेदन सादर केले.यावेळी आशिष साहू, श्रीकांत ठाकरे, अनुप राऊत, गजानन डोंगरे, उत्तम मोडक व संघटनेचे पदाधिकारी शिष्टमंडळात होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...