July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ च्या नियम ११ मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड

नांदेड , दि. ०९ ( राजेश एन भांगे ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (1966 चा महाराष्ट्र अधिनियम 41) याच्या कलम 328, च्या पोट-कलम (1) व पोट-कलम (2) चे खंड (चार), (दहा), (चौदा) आणि (त्रेसष्ठ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत.

या नियमाचा पुढील मसुदा उक्त संहितेच्या कलम 329, च्या पोट-कलम (1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, त्याद्वारे बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तीच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा दिनांक 31 मार्च 2020 किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल.

महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई 400032 यांचे कडे वरील दिनांकास अथवा त्यापूर्वी मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

नियमांचा मसुदा

या नियमांना, “महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम, 2020” असे म्हणावे. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मधील नियम, 11 च्या पोट-नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात, “रुपये 35,000” या मजकुरा ऐवजी “रुपये 8,00,000” हा मजकूर दाखल करण्यात येईल, अशी अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे सह सचिव रमेश चव्हाण यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!