Home पश्चिम महाराष्ट्र सैनिकी वसतीगृहातील अस्थायी कर्मचाऱ्यांचे लॉकडाऊन काळातील मानधन अदा करावे – शंभुसेना ,...

सैनिकी वसतीगृहातील अस्थायी कर्मचाऱ्यांचे लॉकडाऊन काळातील मानधन अदा करावे – शंभुसेना , माजी सैनिक आघाडी

517

पुणे , (प्रतिनिधी) – राज्य सैनिक कल्याण विभागाच्या माध्यमातून चालत असलेल्या मुला / मुलींच्या वसतीगृहात काम करणाऱ्या अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन व मानधन बंद करणाऱ्या प्रशासकीय परिपत्रका विरोधात शंभुसेना व माजी सैनिक आघाडीच्या वतीने निवेदन देऊन सदर अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुकतीच शंभुसेना व माजी सैनिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सैनिक कल्याण – पुणे विभागाचे उपसंचालक कर्नल आर.आर. जाधव यांना प्रत्यक्ष भेटून, राज्यातील मुला / मुलींच्या वसतीगृहात काम करणाऱ्या अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन व मानधन बंद करणाऱ्या परिपत्रका विरोधात शंभुसेना प्रमुख,माजी सैनिक दिपक राजेशिर्के, माजी सैनिक आघाडीचे आनंद ठाकूर, सुनिल काळे, बाबासाहेब जाधव आदी कार्यकर्त्यांनी निवेदन देत सदर अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली. हेच माजी सैनिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राम कोरके व शंभुसेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सैनिक कल्याण व कामगार मंत्री मा. दादाजी भुसे यांची नागपूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करून निवेदन दिले.यावेळी सैनिकांचा प्रॉपर्टी टॅक्स , विविध प्रश्न व समस्यांविषयी चर्चा झाली. तसेच सध्या रिक्त असलेल्या संचालक पदावर राज्य सैनिक कल्याण विभागाकडून एका स्थायी, पात्र व सक्षम माजी सैनिक अधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करावी, राज्यातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हाव्यात अशी विंनती करण्यात आली यावर उत्तर देत, सैनिक कल्याण मंत्री यांनी निवेदनातील विविध मागण्या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. तरी सरकारने तात्काळ कामगार हिताचा योग्य निर्णय न घेतल्यास राज्यस्तरीय तीव्र आंदोलनाचा शंभुसेना संघटना व माजी सैनिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.