Home सातारा डॉ. दिलीपराव येळगाकरांचा वाढदिवस आर्सेनिक एल्बम-30 C’ गोळ्या वाटुन साध्या पद्धतीने साजरा

डॉ. दिलीपराव येळगाकरांचा वाढदिवस आर्सेनिक एल्बम-30 C’ गोळ्या वाटुन साध्या पद्धतीने साजरा

552

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – गेली दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मा.आमदार डॉ. दिलीपराव येळगाकर यांच्या वाढदिवसानिमित्त मायणी व मायणी परीसरात घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथिक औषध गोळ्यांचे बाटल्यांचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या काळात डॉ. दिलीपराव येळगाकर युवा मंच ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे , मोफत अन्न दान केले आहे .

या साठी ग्रामपंचायत सदस्य जग्गनाथ भिसे व नितीन झोडगे ,विजय कवडे,राजु कचरे,यांनी परीश्रम घेतले कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच मायणी येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या “आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे वाटप डॉ. दिलीपराव येळगाकर युवा मंच यांनी वाढदिवसा निमित्ताने वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने खटाव माणचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या पार्श्‍वभूमीवर येथील कार्यकर्त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला डॉक्टर दिलीप येळगाकर यांच्याकडे दरम्यानच्या काळात कोणतीही सत्ता नसताना काम करण्याची धमक असणाऱ्या कार्यकर्त्यांना कायम बळ देण्याची भूमिका यामुळे आज ही त्यांच्या जवळ कार्यकर्त्यांचा गराडा असतो या वाढदिवसाचे निमित्त साधून मायणी येथे नागरिकांची शारीरिक क्षमता वाढवावी रोग प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी यासाठी ज्येष्ठ नागरिक यांना संपूर्ण गावात अर्सेनिक अल्बम थर्टी या होमिओपॅथी यांचे वाटप कार्यकर्त्यांनी केले याप्रसंगी सौ उर्मिला येळगावकर, अभिजीत येळगावकर, सरपंच युवा नेते सचीन गुदगे.उपसरपंच आनंदा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे, सुरज पाटील प्रतिनिधी सदस्य कुमार शेठ देशमुख, विलास सोमदे गणीभाई भाई. शंकर काटकर. दिलीप कदम नंदकुमार पुस्तके. केशव शिंदे. राजू कचरे व ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके, अरुण सुकदरे व डॉक्टर दिलीप येळगावकर युवामंच सदस्य उपस्थित होते.