Home मराठवाडा निदेशक व संगणक शिक्षक यांच्या नियुक्तीसाठी प्रहार संघटनेचे राज्यभर “घर बैठ” आंदोलन….!

निदेशक व संगणक शिक्षक यांच्या नियुक्तीसाठी प्रहार संघटनेचे राज्यभर “घर बैठ” आंदोलन….!

268

१६ हजार शिक्षक होणार सहभागी
५ जून रोजी आंदोलन….!!

अंबड – प्रतिनिधी

जालना – अतिथी निदेशक अर्थात चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक तसेच संगणक शिक्षक यांच्या प्रलंबित नियुक्तीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्यभर घरबैठे आंदोलन दि ५ जुन २०२० वार शुक्रवार रोजी सकाळी ९ ते १०या वेळेत करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे निवेदन मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, यांना ईमेल केले आहे.यासह संघटनेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे.
घर बैठे आंदोलनात राज्यभरातील ८००० अतिथी निदेशक व ८००० संगणक शिक्षक असे १६००० शिक्षक सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्यातील अंशकालीन निदेशक अर्थान चित्रकला, कार्यानुभव व क्रीडाशिक्षक यांना गेल्या वर्षापासून नियुक्त्या दिल्या नाहीत. एकीकडे शासनाने नियुक्त्या दिल्या नाहीत आणि लोक डाऊनमूळे मजूरी नाही, अशा अवस्थेत हे शिक्षक सापडलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत व कौशल्यात वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे असून चित्रकला,कार्यानुभव व शारिरीक शिक्षण हे विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्याकरिता विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याण्यासाठी या निदेशकांची नियुक्ती गरजेची आहे.
तसेच शिक्षणात संगणकाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी संगणक व ई लर्निंग आदी सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र यासाठी तज्ञ असलेल्या संगणक शिक्षकांना अध्याप नियुक्ती दिलेल्या नाहीत. राज्यात इयत्ता नववी व दहावी करिता संगणक शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना देखील मागील वर्षापासून नियुक्ती देण्यात आली नाही. संगणक शिक्षक नसल्याने नववी व दहावी साठी आयसीटी विषय केवळ नावाला शिकवला जातो. विद्यार्थ्यांना संगणक अध्यापनाकरिता शाळेला मिळालेल्या ३३ लाखाच्या संगणक लॅब शिक्षक नसल्यामुळे धूळखात पडून आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता या शिक्षकांनाही नियुक्त देणे गरजेचे आहे.
अतिथी निदेशक – अंशकालीन निदेशक व संगणक शिक्षकांच्या नियुक्ती प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील हे सर्व शिक्षक आपल्या घरासमोरील अंगणात सकाळी ९ ते १० या वेळेत घरबैठे आंदोलन दिनांक ५ जुन २०२० वार शुक्रवार रोजी करण्यात येणार आहे. तरी याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना मराठवाडा विभाग अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी प्रशासनाकडे केली असून या आंदोलनात राज्यातील अतिथी निदेशक, संगणक शिक्षक यांनी सहभाग नोंदवावा असे राज्याध्यक्ष अजय तापकीर ,राज्य सरचिटणीस विकास घुगे, कार्याध्यक्ष संजय बागडी, खजिनदार कृष्णा बोधले,राजांबर मते , बाबूसिंग राजपूत , संदीप धुळे,गजानन पवार ,नंदू पुसावळे ,लहा मगे ,किसन गायके यासहअनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.